• Sun. May 4th, 2025

डॉ आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हाडाचे 40 घरे उजळली प्रकाशाने  महावितरणने वीज कनेक्शन देऊन जपली बांधिलकी

Byjantaadmin

Apr 15, 2023

डॉ आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हाडाचे 40 घरे उजळली प्रकाशाने  महावितरणने वीज कनेक्शन देऊन जपली बांधिलकी
निलंगा:14 एप्रिल भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन.त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती चे औचित्य साधून निलंगा महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा शहर सहाय्यक अभियंता विवेक स्वामी यांनी जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हाडा वस्ती मधील सामान्य कष्टकरी गोरगरीब कुटुंबातील 40 घरांना वीज कनेक्शन देऊन संगणक युगात विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचाएक प्रकारे प्रयत्न केला आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने निलंगा महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी येथील अधिकारी आणि कर्मचारी सदैव प्रयत्नशील असतात  निलंगा शहरातील  म्हाडा वसाहती मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून महावितरण कंपनीने प्रकाशमान केली आहे.
निलंगा शहरातील शिवाजीनगर भागातील म्हाडा साधारण 80 ते 90 घराची म्हाडा वसाहतआहे. ही वस्ती बऱ्याच काळापासून अंधारात होती, येथील गोरगरीब जनता विजेच्या कनेक्शन पासून वंचित होती, संगणक युगात हे चित्र बदलून टाकण्यासाठी गरजेचे आहे असे ठाम विश्वास निश्चय करून गोरगरीब मजूर लोकांना आधार देऊन महावितरण चे सहाय्यक अभियंता विवेक स्वामी यांनी आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला 40 घरांचे विजेचे कनेक्शन देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले स्वातंत्र्याचे फळे सामान्य कष्टकरी शेवटच्या माणसापर्यंत मिळाली पाहिजेत असा ध्यास कायम उराशी बाळगणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याना या निमित्ताने महावितरण ने प्रकाशाची पहाट त्यांच्या जीवनात उजळून एक प्रकारे अभिवादन केले आहे या कामी मार्गदर्शक व मोलाचे सहकार्य कार्यकारी अभियंता संजय पोवार यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *