देशाचे हित समोर ठेवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने पुढें जावू या -माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते आंबेडकर पार्क येथे मुख्य ध्वजवंदन आमदार धीरज देशमुख यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
लातूर ; देशाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मार्ग दाखवला एकमेकांना समानता याच मार्गाने गेलो तर या देशाची लोकशाही जिवंत राहू शकते ती ठेवण्याचे काम तुम्हाला आम्हाला करायच आहे पहिल्यांदा देश हित स्वातंत्र्य समता बंधुत्व त्यानंतर पक्षीय राजकारण असा त्याचा क्रम लागतो त्यामुळे देशाचे हित समोर ठेवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने देशाला पुढे घेवुन जावू असे बहुमोल विचार राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त करून उपस्थित सर्व समाजातील नागरिकांना आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या
ते लातूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे भारतरत्न डॉ आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले त्यावेळी मनोगत व्यक्त केले तत्पूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे जयंती निमित्त मुख्य ध्वजवंदन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भंते पैय्यानंद सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, जितेंद्र गायकवाड, साखर संघाचे आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ , चंद्रकांत चिकटे, मोहन माने, अनंत लांडगे, लक्ष्मण कांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड किरण जाधव अँड बाबासाहेब गायकवाड, नागसेन कामेगावकर, सुरेश चव्हाण हरीराम कुलकर्णी, दगडू मिटकरी, बालाजी कांबळे, प्रवीण कांबळे , प्रवीण सुर्यवंशी, शिवाजी कांबळे, आदी मान्यवर तसेच मोठ्या प्रमाणावर सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते