जनतेचे लक्ष मुलभूत प्रश्नापासून विचलित करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध,लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस (ग्रामीण) कडून जिल्हाधिकार्यांना निवेदन
लातूर प्रतिनिधी-भारतीय जनता पक्ष केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेच्या महागाई,बेरोजगारी,महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना यावरून जनतेचे लक्ष विचलित
करण्याचे काम करण्यासोबतच कॉंग्रेस नेत्याचे, महिलांचे चारित्र्य हनन करण्याचा देखील प्रयत्न चालू आहे. देशाच्या राजकारणाची पातळी खाली आणण्याचे काम भाजप कडून गेल्या काही वर्षात सुरु आहे.याला पायबंद घातला जावा अन्यथा महिला कॉंग्रेस कडून गल्ली पासून दिल्ली पर्यंत भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत केंद्र सरकार व भाजपचा लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस (ग्रामीण) कडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस(ग्रामीण) च्या वतीने मंगळवार दिनांक ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी लातूर यांना देण्यात आले. यावेळी सौ.सुनीता आरळीकर, सीमा क्षीरसागर, सौ.मीनाक्षी जगताप, सौ.सविता पवार,सौ.संगीता पतंगे, सौ.रोहिणी शिंदे, सौ.सुरेखा गायकवाड यांच्यासह लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस (ग्रामीण) च्या महिला पदाधिकारी,सदस्य उपस्थित होत्या .