
पंढरपूर : काय झाडी…काय डोंगार..काय हाॅटेल या डाॅयलाॅगमुळे राज्यभरात चर्चेत आलेले सांगोल्याचे शिवसेनेचेआमदार शहाजी पाटील पुन्हा एकदा आपल्या भाषणा दरम्यान केलेल्या फटकेबाजीमुळे चर्चेत आले आहेत. भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेयांच्यावरील प्रेमापोटीच आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहीर सांगितले, तर कोण कुठेही असले तरी शेवटी शरद पवारांच्याफांद्या असल्याचे सांगत शरद पवारांवर आपली किती निष्ठा आहे, हेही त्यांनी स्पष्ट सांगितले.
राजकारणात कुण कणाचं नसतं. सगळ्यांना गोड बोलून काम करावी लागतात. शरद पवार, शिंदेसाहेब यांच्यासह अनेक राजकीय नेते मला आपलं मानतात, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.