अखेर अनेक नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीच्या नागपूर येथे 16 एप्रिल रोजी होणाऱ्या ‘वज्रमूठ सभे’ला नागपूर शहर पोलिसांनी काही अटी शर्थींसह परवानगी दिली आहे. आघाडीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावनानगर मैदानावरील सभेचा वज्रमूठ सभेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सभेला अवघे तीन दिवस शिल्लक राहिलेले असताना पोलिसांची परवानगी न मिळाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.
छत्रपती संभाजीनगर येथील यशस्वी सभेनंतर MVA च्या नागपूर येथील सभेला परवानगी मिळण्याबाबत पोलिसांकडे अर्ज केला होता. सभेला अवघे तीन दिवस शिल्लक राहिलेले असताना पोलिसांची परवानगी न मिळाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. तसेच आघाडीच्या सभेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, अखेर पोलिसांनी देखील या सभेला परवानगी दिली आहे, मात्र याचवेळी सभेसाठी काही अटी आणि शर्ती देखील घालून दिल्या आहेत.
महाविकास आघाडीची संयुक्त वज्रमूठ सभेसाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष जोरदार तयारी करत आहेत. त्यादृष्टीने तीनही पक्षाच्या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सभास्थळी भेट दिली आहे. या वज्रमूठ सभेला माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख UDHAV THAKRE विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांची उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पोलीस आयुक्त काय म्हणाले?
आयोजकांनी आम्हाला 10 हजार लोक या सभेसाठी येतील अशी माहिती दिली आहे. मैदानाची मालकी असलेल्या NITने त्यांना मैदानाच्या मालकीची परवानगी दिली आहे. त्या आधारावर पोलिसांनी महाविकास आघाडीच्या सभेसाठी पोलीस परवानगी दिली आहे अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.