भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैजनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाचा छापा पडला आहे. जीएसटी अधिकारी गुरुवारी (दि.१३) सकाळपासून मुंडे यांच्या साखर कारखान्यावर पोहचले होते. त्यांच्याकडून आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू आहे. केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
परळी येथील पंकजा मुंडे यांच्या वैजनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे. मात्र, या कारवाईमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी ही कारवाई सुरू असल्याचं बोललं जात आहे. मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. याचदरम्यान मुंडे याच्या कारखान्यावर जीएसटी विभागाकडून कारवाई होत असल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
परळी येथील पंकजा मुंडे यांच्या वैजनाथ सहकारी साखर कारखान्यावर (GST) विभागाकडून करण्यात आलेली छापेमारी मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तसेच भाजपविरोधी नेत्यांवरच केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होते, त्यांच्याच चौकशा होतात हा विरोधकांचा आरोप होत असतानाच मुंडेंवरील कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे.
बीड परळीतील राजकारणावरुन एकमेकांवर नेहमीच टीकेची झोड उठविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री DHANJAY MUNDE आणि पंकजा मुंडे यांचे बंधू भगिनी भगवानगडावरील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. आजदेखील धनंजय मुंडे, पंकजा मुंडे या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. मात्र इकडे परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे.तर पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चेत आल्या होत्या.