महाराष्ट्र महाविद्यालयाच्या चार विद्यार्थीनी स्वारातीम विद्यापिठाच्या गुणवत्ता यादित
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाचे चार विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील उन्हाळी २०२२च्या परीक्षेत विविध विषयात विद्यापीठातून सर्वप्रथम आले आहेत. कु. शिरुरे योगिता या विद्यार्थिनीने बी. ए. पदवी परीक्षेत हिंदी ऐच्छिक विषयात विद्यापीठातून सर्वप्रथम आल्याबद्दल डॉ. सुर्यनारायण रणसुभे यांच्या वतीने दिला जाणारा डॉ. चंद्रभानु वेदालंकर स्मृती पारितोषिक व हिंदी अभ्यास मंडळाच्या वतीने दिला जाणारा रोख पारितोषिक अशी दोन पारितोषिके पटकावली. अर्थशास्त्र विषयात विद्यापीठातून सर्वप्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कु. राऊतराव महादेवी हिला प्राचार्य गौ. रा. म्हैसेकर अमृत महोत्सव समिती प्रायोजित कै. पद्मश्री कदम पारितोषिक प्राप्त झाला. पदवी प्रथमवर्ष इंग्रजी अनिवार्य विषयात विद्यापीठातून सर्वप्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कु. झरे दिपाली या विद्यार्थिनीस इंग्रजी अभ्यास मंडळद्वारा दिले जाणारे डॉ. ए. पी. विठ्ठल पारितोषिक प्राप्त झाले. तर संगणकशास्त्र पदवी परीक्षेत सर्वप्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कु. दिवे यशोदा या विद्यार्थिनीस रॉयल एज्युकेशन सोसायटी लातूरच्या वतीने दिला जाणारा राजर्षी शाहू महाराज रोख पारितोषिक देण्यात आले.
या गुणवंत विद्यार्थ्यांना स्वारातीम विद्यापीठाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात मा. कुलगुरू उद्धव भोसले यांच्या उपस्थितीत नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांच्या हस्ते रोख पुरस्कार व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय पाटील निलंगेकर, सचिव मा. बब्रूवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, प्रा. प्रशांत गायकवाड, डॉ. बालाजी गायकवाड, डॉ. गोविंद शिवशेट्टे, डॉ. शेषराव देवनाळकर, डॉ. अजित मुळजकर, डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. रवींद्र मदरसे, प्रा. गिरीश पाटील व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्र महाविद्यालयाच्या चार विद्यार्थीनी स्वारातीम विद्यापिठ पुरष्काराच्या मानकरी
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाचे चार विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२च्या परीक्षेत विविध विषयात विद्यापीठातून सर्वप्रथम आले आहेत. कु. शिरुरे योगिता या विद्यार्थिनीने बी. ए. पदवी परीक्षेत हिंदी ऐच्छिक विषयात विद्यापीठातून सर्वप्रथम आल्याबद्दल डॉ. सुर्यनारायण रणसुभे यांच्या वतीने दिला जाणारा डॉ. चंद्रभानु वेदालंकर स्मृती पारितोषिक व हिंदी अभ्यास मंडळाच्या वतीने दिला जाणारा रोख पारितोषिक अशी दोन पारितोषिके पटकावली. अर्थशास्त्र विषयात विद्यापीठातून सर्वप्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कु. राऊतराव महादेवी हिला प्राचार्य गौ. रा. म्हैसेकर अमृत महोत्सव समिती प्रायोजित कै. पद्मश्री कदम पारितोषिक प्राप्त झाला. पदवी प्रथमवर्ष इंग्रजी अनिवार्य विषयात विद्यापीठातून सर्वप्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कु. झरे दिपाली या विद्यार्थिनीस इंग्रजी अभ्यास मंडळद्वारा दिले जाणारे डॉ. ए. पी. विठ्ठल पारितोषिक प्राप्त झाले. तर संगणकशास्त्र पदवी परीक्षेत सर्वप्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कु. दिवे यशोदा या विद्यार्थिनीस रॉयल एज्युकेशन सोसायटी लातूरच्या वतीने दिला जाणारा राजर्षी शाहू महाराज रोख पारितोषिक देण्यात आले.