सत्यशोधक राष्ट्रपीता जोतिबा फुले जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडची मानवंदना.
लातूर : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्यसेनानी. बहुजन महामानव. सत्यशोधक राष्ट्रपीता जोतिबा फुले जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने लातूर येथील राष्ट्रपीता जोतिबा फुले यांच्या भव्य पुतळ्यास फुलमाला घालून मानवंदना दिली आणी गौरवपूर्ण घोषना देऊन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक उमाकांत उफाडे. महानगर अध्यक्ष मिथुन दिवे. तालुकाध्यक्ष अॅड मनोजकुमार नरवडे. विद्यार्थी आघाडी लातूर शहराध्यक्ष अशिष अजगरे. धडाडीचे पदाधिकारी शशिकांत राऊत. अनिल समंधे. आनंद दरकसे. नामदेव कांबळे. जयप्रकाश देवकते. यशपाल गायकवाड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच रात्री विक्रम नगर येथे प्रबोधनपर व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते.