माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला एक फडतूस गृहमंत्री लाभलेला आहे अशी बोचरी केली होती. ही टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. यानंतर फडणवीसांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील ठाकरेंवर घणाघाती टीका केली होती. आता ठाकरे गटाच्या नेत्याकडून बावनकुळेंची तुलना थेट वेस्ट इंडिजच्या खेळाडूशी करण्यात आली आहे.
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी बावनकुळेंवर निशाणा साधला. जाधव म्हणाले, बावनकुळे हे महाराष्ट्राचे आहेत, पण दिसतात वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे. बावनकुळे पॅट्रिक पॅटरन, ब्रायन लारासारखे दिसतात का तर नाही. मग, ते कोणासारखे दिसतात, तर वेस्ट इंडिजचे खेळाडू कर्टली एम्ब्रोससारखे दिसतात. जुन्या लोकांना माहिती आहे, एम्ब्रोस कसे दिसत होते.
बावनकुळे यांनी बावनकुळेंना इशारा दिला. ते म्हणाले, तुम्ही वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे दिसता. पण, ते खेळाडू होते, तुम्ही कोणाबरोबर खेळताय, उद्धव ठाकरेंबरोबर. ठाकरे तुम्हाला एका चेंडूत आऊट करतील, पत्ता सुद्धा लागणार नाही असंही जाधव यावेळी म्हणाले.
अरे भास्कर..! चित्रा वाघांची खरमरीत टीका
भास्कर जाधव यांनी bawankuleवर केलेल्या टीकेचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्या म्हणाल्या, कोण विचारत नाही म्हणून एवढ्या खालच्या दर्जाचं विधान करून लोकांचं लक्ष वेधून घेण्याची तुमची ही तऱ्हा आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. पण किती खाली पडायचं याला पण काहीतरी लिमिट असू द्या! तुमच्यासारख्या लोकांनी राजकारणाचा चिखल केल्याची टीकाही केली.
वाघ म्हणाल्या, आमचे मा.प्रदेशाध्यक्षजी यांच्या कामाबद्दल बोलायची तुमच्यात हिंमत नाही तर आता त्यांच्या वर्णावरून बोलायला लागला असे करून तुम्ही फक्त बावनकुळे यांचा अपमान करत नाही आहात. तर समस्त कृष्णवर्णीयांचा अपमान करताहात असा हल्लाबोल वाघ यांनी केला.
असो, तुमच्यासारख्या अकार्यक्षम आणि निर्बुद्ध लोकांकडून दुसरी काय अपेक्षा? राजकारणात तुम्ही आलातच आहात स्वतःचे खिसे भरून लोकांना नाव ठेवायला. स्वतःच्या शब्दांची जरा जरी लाज असेल तर ताबडतोब माफी मागा! बाकी…देव तुमच्यासारख्यांना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना असा टोलाही जाधव यांना chitra wagh नी लगावला आहे.
बावनकुळे काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्याने मर्यादा ओलांडली आहे. पण अजूनही आम्ही त्यांना आज शेवटची संधी देत आहोत. यापुढे जर आमच्या नेत्यांबाबत अशी वक्तव्य करणार असाल तर तुम्हाला सोडणार नाही. तुमचे घराबाहेर पडणे मुश्कील होईल. ज्या फडणवीसांना तुम्हाला भावासारखे प्रेम दिले त्यांच्याबद्दल तुम्ही अशी विधाने कराल असे कधीच वाटले नव्हते, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.