आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) या पक्षाने महाराष्ट्रात आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
चंद्रशेखर राव यांनीmaharashtra तील मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘बीआरएस’ची 24 एप्रिलला जाहीर सभा होणार आहे. या सभेला चंद्रशेखर राव हे उपस्थित असणार आहेत. मात्र, याच सभेत चंद्रशेखर राव हे काँग्रेस आणि ‘आप’ला मोठा धक्का देण्याची शक्यता आहे.
congressचे दोन आमदार पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात दोन आमदार प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मग ते दोन आमदार कोण? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. जर असं झालं तर राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो.
तसेच आपचेही काही नेते चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे. दरम्यान, या आधी माजी आमदार harshwardhan jadhav यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. तर बीडमधील mns च्या काही कार्यकर्त्यांनीही बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.