बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा उमेदवार निवडीबाबत दिल्लीत झालेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीबाबत नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे उमेदवारांची यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच येडियुराप्पा दिल्लीहून बंगळूरला निघून आले आहेत. सोमवारी सायंकाळी ते सव्वा पाचच्या विमानाने ते बंगळूरला आले आहेत.
येडियुराप्पा यांनी आपल्या जवळच्या मित्रांना सांगितले की, माझी हायकमांडशी चर्चा संपली आहे, म्हणून मी बंगळूरला येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या घरात बैठकीचे आयोजन केले होते. नड्डा घरी आल्यानंतर १० मिनिटांत येडियुराप्पा घराबाहेर आले आणि बंगळूरकडे निघून गेले.