केंद्रीय निवडणूक आयोगा(Election Commission of India)ने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि सीपीय अर्थात भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचाही राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आयोगाच्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिकिया उमटत आहे. याचदरम्यान, भाजपच्या बड्या नेत्यानं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल असं सूचक वक्तव्य केलं आहे.
भाजप नेते व शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे.
मुनगंटीवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला यात धक्कादायक काय आहे. उद्या जर मी परीक्षा देणार असेल आणि जर त्यात मी नापास झालो तर निकाल सुद्धा तसाच लागणार ना.. त्यामुळे यात धक्कादायक असे काहीच नाही असं ते म्हणाले.
याचवेळी मुळात राष्ट्रीय पक्ष म्हणून जे काही निकष आहेत यावर हा निर्णय असतो. पेपर न देता मेरीटची गुणवत्ता येणार आहे का. त्यांना राज्यात काही मतं कमी पडली आणि त्यामुळे निकष पूर्ण करता आले नाही आणि म्हणून हा निकाल लागला. लोकप्रियता मिळणे कठीण आहे पण जर पुन्हा अशी लोकप्रियता मिळाली तर पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल असं सूचक विधानही केसरकर यांनी यावेळी केलं आहे.
..म्हणून त्या सर्वांचं भाजपात स्वागतच!
एखाद्या पक्षाचा आमदार आम्हाला विश्वासाने भेटतो आणि विश्वासाने सांगतो की देश प्रगती करतो आहे. या प्रगतीमध्ये आम्हाला देखील योगदान करायचे आहे आणि bjpचा झेंडा हाती घेऊन आम्हाला काम करायची इच्छा आहे.तेव्हा हा संवाद पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांची नावे सांगणे योग्य नाही.आणि आता जर त्याची नावे सांगितली तर आपल्याकडे जो कायदा आहे त्यात त्यांना राजीनामा द्यावा लागतो.
आणि म्हणून निवडणुकीच्या वेळेस हे सगळेजण प्रवेश करतील आणि म्हणून जनहितासाठी जो जो भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेईल त्यांचा आम्ही स्वागतच करणार आहे असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले आहे.
…तेव्हा तुम्ही किती दौरे केले?
मुख्यमंत्री (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्री, आमदार खासदारांसह अयोध्येचा दौरा केला.या दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीका करताना अवकाळी पावसाळीनं झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. या टीकेला मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ते म्हणाले, मला कधी कधी विरोधकांच्या रिकाम्या जागेची कीव केली पाहिजे असं वाटतं. सरकारचा मंत्री जाऊन पंचनामे करत नाही. तो फक्त पंचनामे पाहून ते योग्य झाले की नाही हे पाहतो. आता जे नुकसान झाले आहे त्यावर मंत्री लक्ष ठेवून आहेत. तुमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्ही किती दौरे केले असा सवालहा महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहे.