कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकायची या इराद्याने भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री ravsaheb danve , केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड यांचा समावेश आहे. यांच्यावर वेगवेगळ्या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी bjp जोरदार मोर्चेबांधणी करत असून भाजपसाठी अवघड वाटणाऱ्या 54 मतदारसंघात भाजपने एकएका नेत्याची नियुक्ती केली आहे. यामध्ये भाजपचे नेते ram shinde यांच्यावर कर्नाटकच्या अनेकल विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, karnatak विधानसभा निवडणुकीसाठी 13 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. 20 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 10 मे रोजी मतदान आणि 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.