मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे अयोध्येत जंगी स्वागत करण्यात येत आहे. या अयोध्या दौऱ्याची मोठी चर्चाही सुरू आहे. फडणवीस अयोध्या दौऱ्यावर असतानाच इकडे महाराष्ट्रात मात्र, अजित पवारांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे
ajit pawar हे आज satara जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी भाजप नेते अमित कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला साताऱ्यात मोठं खिंडार पडलं आहे.
अमित कदम यांचा ncpत प्रवेश हा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे सातारा- जावळी मतदारसंघात आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
सातारा- जावळी मतदारसंघात यापूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची मोठी ताकद होती. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी bjpमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते भाजपमधून आमदार झाले. त्यामुळे सातारा- जावळी तालुक्यांतील राष्ट्रवादीची ताकद विभागली गेली होती.
कोण आहेत अमित कदम?
अमित कदम हे आधी राष्ट्रवादीतच होते. 2017 ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. कदम यांची राजकीय कारकीर्द पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य व शिक्षण व अर्थ समीती सभापतीपदापर्यंत राहिली आहे. आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सातारा-जावळी मतदारसंघात राष्ट्रवादीकडून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे