• Thu. May 1st, 2025

शिवसेना भवन आणि निधी शिंदे गटाला द्या, वकिलाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

Byjantaadmin

Apr 10, 2023

काही महिन्यांपूर्वी ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना मुख्यनेते बनले आहेत. त्यामुळे शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदेंना देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

आशिष गिरी असे याचिका दाखल करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. तसेच, कोणत्याही गटाचा कार्यकर्ता नसल्याचे आशिष गिरी यांनी स्पष्ट केले आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आशिष गिरी म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंना अध्यक्ष म्हणून कायम ठेवले, तर shivsena भवन, निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्या. तसेच, निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा, अशी मागणी केली आहे.”

“निवडणूक आयोगाच्या निकालासंदर्भात उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता माझीही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात यावी,” अशी मागणीही गिरी यांनी केली.

मी कोणत्याही पक्षाशी संलग्न नसून, याचिकेचा शिंदे गटाशी संबंध नाही. एक वकील आणि मतदार असल्याने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. मी कायद्याच्या बाजूने आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला, तर सर्व त्यांना देण्यात यावे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला, तर त्यांना दिले जावे. मात्र, आता सर्व गोष्टींवर निर्बंध लागण्यात यावे,” असे गिरी म्हणाले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *