भारतीय बालरुग्ण संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी
डॉ. विनोद स्वामी तर सचिवपदी डॉ. असद पठाण
लातूर : भारतीय बालरुग्ण संघटना लातूर शाखेचा स्थापना समारंभ नुकताच ऑफिसर्स क्लब येथे पार पडला. यावेळी संघटनेचे 2023 ते 2027 कार्य वर्षासाठी डॉ. विनोद स्वामी यांची अध्यक्ष तर डॉ. असद पठाण यांची सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. दिपिका भोसले यांनी शैक्षणिक वार्तालापाने केली. त्यानंतर स्थापना समारंभास सुरुवात झाली. यावेळी वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. गिरीष मैंदरकर, डॉ. सुरेश भट्टड, डॉ. अशोक आरदवाड, डॉ. निता म्हस्के – पाटील व डॉ. कविता मैंदरकर यांनी मार्गदर्शन केले.
गतवर्षीचे सचिव असलेले डॉ. नितीन येळीकर यांनी अहवाल वाचन तर अध्यक्ष असलेले जितेन जयस्वाल यांनी मनोगत व्यक्त केले. संघटनेच्या इतर पदावर देखील नियुक्ती करण्यात आल्या खजिनदार पदी डॉ. सुनील होळीकर, उपाध्यक्षपदी डॉ. अय्याज शेख व डॉ. विशाल मैंदरकर, संयुक्त सचिव पदी डॉ. चैतन्य सोमवंशी, डॉ. नितीन ढोबळे व डॉ. सतीश चंद्र पेड तर शैक्षणिक प्रतिनिधी म्हणून डॉ. दिपिका भोसले यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या सल्लागार समितीचे सदस्य डॉ. सुबोध सोमानी, डॉ. दत्ता गोजमगुंडे, डॉ. राजीव कुलकर्णी, डॉ. महेश सोनार, डॉ. सुनील कुलकर्णी, डॉ. वर्धमान उदगीरकर, डॉ. शिवप्रसाद मुंदडा, डॉ. विद्या कांदे व डॉ. संदिपान साबदे हे लातूरचे नामवंत बालरोग तज्ज्ञ आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिल्पा दळगे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. विनोद स्वामी यांनी बालरोग तज्ज्ञांच्या ज्ञानात भर होईल असे विविध वैज्ञानिक परिषदेत तसेच कार्यशाळा येत्या वर्षात आयोजित करण्याचा संकल्प केला. त्याचा फायदा लातूरमधील सर्व बाल रुग्ण व त्यांच्या पालकांना होईल तसेच डॉक्टरांच्या दगदगीच्या जीवनशैलीत थोडा विरंगुळा होईल असेही उपक्रम राबविण्याचा निश्चय व्यक्त केला. डॉ. असद पठाण यांनी आभार मानले. अत्यंत खेळीमेळीच्या व कौटुंबिक आपुलकीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.