• Thu. May 1st, 2025

“उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त करून शिवशाही आणण्यासाठी आमचा अयोध्या दौरा..”

Byjantaadmin

Apr 9, 2023

मुख्यमंत्री EKNATH SHINDE यांची शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रामदास कदम हे मागील काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख UDHAV THAKRE  कठोर टीका करत आहेत. आज अयोध्या दौऱ्याच्या पार्शभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.कदम हे एकनाथ शिंदेंसोबत अयोध्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. यावेळी त्यांना अयोध्या का चाललात असे विचारले असता, त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

“उद्धव ठाकरेंना आम्ही उध्वस्त करून, राज्यात शिवशाही आणण्यासाठी प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घ्यायला आम्ही अयोध्येला रवाना होत आहेत, असा घणाघात कदम यांनी केला. कदम म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बेईमानी करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. उद्धव ठाकरे यांना उध्वस्त करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्यास शांती मिळावी, बाळासाहेबांना स्वप्नातली शिवशाही महाराष्ट्रात पुन्हा आणावी, तसेच बाळासाहेबांच्या विचारांचं काम राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून व्हावं, म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अयोध्येला निघत आहोत, असे कदम म्हणाले.

रामदास कदम पुढे म्हणालो, चोर कोण आहे आणि साव कोण? याचा निर्णय लवकरच होणार आहे, लवकरच दूध का दूथ आणि पाणी का पाणी होऊन, सर्व काही स्पष्ट होईल. आमच्या आमदारक्या कोणी चोरल्या, नेत्यांची मंत्रिपदं कोणी चोरली? आता ते मातोश्रीमध्येच बसून आहेत. सर्वकाही लवकरच स्पष्ट होईल. त्यांची यावर टीका म्हणजे सौ चूहे खा के बिल्ली हज को चली अशीच आहे. त्यांची अवस्था म्हणजे, खोटं बोल पण रेटून बोल अशी आहे, असे कदम म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *