कॉंग्रेसच्या वतीने जय भारत सत्याग्रह हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारणीची बैठक प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये होणार आहे. सोमवारी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ ते 3 या वेळेत हि बैठक होणार आहे.
प्रदेश अध्यक्ष nana patole यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते balasaheb thorat माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण तसेच प्रदेश कार्याध्यक्ष, सहप्रभारी आदींसह इतर दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.या बैठकीत नवीन कार्यकारणीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच काही महत्त्वपूर्ण ठरावही केले जाणार असल्याची माहिती शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या निमित्ताने जय भारत यात्रेचा शुभांरभ केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी राजकीय परिस्थिती लक्षात घेता विविध विषय हाताळत मतदारापर्यंत पोहोचण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असणार असल्याचे त्यानी याप्रसंगी सागितले. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, प्रवक्ते राहुल पिंगळे व रमेश इंदिसे आदि पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही काँग्रेस पक्षाची विचारधारा मानणारे असून पक्षाने दिलेल्या आदेशानुसार अथवा सूचनेनुसार आम्ही कामकाज करीत असल्याचे विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.