• Wed. Apr 30th, 2025

राष्ट्रवादी कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवणार; पण मोजक्या जागांवर : शरद पवारांची घोषणा

Byjantaadmin

Apr 9, 2023

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक (Karnataka) विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. काही मोजक्या जागांवर आम्ही आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक उभे करणार आहोत. जास्त जागांवर आम्ही निवडणूक लढवणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. नाशिकमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. यावेळी पवार यांच्यासोबत माजी मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले, तर त्याचा फायदा भाजपला होणार नाही का, या प्रश्नावर पवार म्हणाले की, कर्नाटकात विधानसभेच्या जागा अंदाजे २५० च्या आसपास आहेत. त्यातील पाच जागांवर आम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले, तर भाजपला फायदा होईल, असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. कर्नाटकात आमचं ध्येय महाराष्ट्र एकीकरण समिती आहे. मराठी भाषिक आहेत, त्या मराठी भाषिकांमध्ये मतभेद नकोत, एकवाक्यता कशी करता येईल. तसेच, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना मदत कशी होईल, अशी आमची भूमिका राहणार आहे.महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आमची भूमिका कायम राहिलेली आहे. या प्रश्नावर स्वतः छगन भुजबळ आणि आमचे अनेक सहकारी कारागृहामध्ये जाऊन आलेले आहेत. असं असताना शक्यतो मराठी भषिकांमध्ये एकवाक्यता कशी राहील, याची काळजी आम्ही घेतो, तेही सहा-सात मतदारसंघापेक्षात. त्यापेक्षा अधिक नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर येणार : पवार

पवार म्हणाले की, मला कर्नाटकातील परिस्थिती माहिती आहे. मी आमच्या अनेक सहकाऱ्यांशी विचारविनिमय केला आहे, त्यानुसार कर्नाटकातील निवडणुकीत भाजपचा पराभव होईल. त्या राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल, असे तेथील चित्र आहे. कर्नाटकातील लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल लोकांना भाजपचे उमेदवार घरी बसवून हवा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *