अलीकेडच हिंडेनबर्ग कंपनीने एक अहवाल जारी केला होता. या अहवालातून हिंडेनबर्ग कंपनीने भारतीय उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरून संसदेतही गदारोळ झाला होता. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून शरद पवारांनी एकप्रकारे गौतम अदाणी यांचं समर्थन केल्याचं दिसत आहे.
एकीकडे अदाणी प्रकरणावरून काँग्रेसने रान उठवलं असताना शरद पवारांनी भाजपाला पूरक भूमिका घेतली आहे. शरद पवारांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातीय राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आपली भूमिका मांडली आहे. शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी भूमिका मांडल्यानंतर आम्गी त्यावर बोलू शकत नाही. त्यांची भूमिका हीच आमच्या पक्षाची भूमिका आहे, असं विधान अजित पवारांनी केलं. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
अदाणी प्रकरणावर शरद पवारांनी केलेल्या विधानाबाबत विचारलं असता ajit pawar म्हणाले, “मीही काल शरद पवारांची मुलाखत बघितली sharad pawar हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने भूमिका मांडल्यानंतर आम्ही त्याबद्दल बोलू शकत नाही. त्यांची जी भूमिका आहे, तीच आमच्या पक्षाची भूमिका आहे.”
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
‘एनडीटीव्ही’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, “एका परदेशी कंपनीच्या अहवालाने देशात खळबळ उडाली आहे. अशाप्रकारची वक्तव्ये याआधीही काही लोकांनी केले होते. काही दिवस संसदेत यावरून गदारोळही झाला होता. आम्ही तर या कंपनीचं कधी नावही ऐकलं नव्हतं. त्या कंपनीची पार्श्वभूमी काय माहिती नव्हतं. अशा विषयावर देशात गदारोळ झाला तर त्याची किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला भोगावी लागते, हे दुर्लक्षित करता येणार नाही. हिंडेनबर्ग अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आलं असं दिसतं.”