कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election) किच्चा सुदीप भाजप व मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा प्रचार करीत आहेत.सुदीप भाजपमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढवणार की नाही देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही.किच्चा सुदीप याच्या भाजप प्रचारावरुन जेडीएस आक्रमक झाली आहे. सध्या जेडीएसच्या निशाणावर सुदीप आहेत.
जनता दल एलचे (JDS) प्रमुख आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सुदीप यांच्याविरोधात तक्रार केली आहे. किच्चा सुदीप यांच्या चित्रपजेडीएसचे नेता तनवीर अहमद म्हणाले, “किच्चा सुदीप हे cm यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत आहेत. भाजपच्या लेटरहेडवरुन माध्यमांना निमंत्रण देत आहेत. ते आता राजकारणात आले असल्याने त्यांच्या चित्रपट, जाहीरातीवर बंदी घालावी,”गेल्या काही दिवसांपूर्वी किच्चा सुदीप 31 गायी दत्तक घेतल्यामुळे चर्चेत आला होता. पुण्यकोटी दत्तू योजनेअंतर्गत कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा 31 गायी त्याने दत्तक घेतल्या आहेत. कर्नाटकचे पशूसंवर्धन मंत्री प्रभू बी चौहान यांच्या निवासस्थानी किच्चाने गायीची पूजा केली होती. तसेच गायींच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या कामाचं त्याने कौतुक केलं., कार्यक्रम, जाहीरातीवर निवडणुक संपेपर्यंत बंदी घालावी, अशी मागणी कुमारस्वामी यांनी केली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, जेडीएस आणि आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारीची यादी जाहीर केल्यानंतर आता भाजप उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार याची सगळ्यानाच उत्सुकता आहे.राज्यातील सत्ताधारी भाजपने अद्याप आपले पत्ते उडलेले नाहीत. उमेदवारी यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली असून त्यावर विचारविनिमय सुरु आहे. भाजप दोन दिवसात म्हणजे ९ एप्रिल रोजी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.
इच्छुक उमेदवारांच्या नावावर नऊ एप्रिल रोजी अंतिम चर्चा होणार आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत bjp मुख्य कार्यालयात होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महासचिव बीएल संतोष, केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.कर्नाटक (Karnataka) विधानसभेसाठी भाजपच्या कोअर ग्रुपने प्रत्येक विधानसभेसाठी तीन नावांची निवड केली आहे. ही तीन नावे केंद्रीय निवडणूक समितीसमोर ठेवण्यात येणार आहेत. या नावातून एक नाव निवडण्यासाठी पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत.