कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 10 मे रोजी आणि 13 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर congress सक्रिय झाली आहे. विशेष म्हणजे ज्या कोलारमधील भाषणामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली त्याच कोलार मधून ते कर्नाटक निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहेत. येत्या १० एप्रिलला कोलार येथे जाहीर सभा घेणार आहेत. त्यानतंर 11 एप्रिलला ते वायनाडलाही जाणार असल्याची माहिती आहे.
लोकसभेचे सदस्य म्हणून अपात्र ठरल्यानंतरची ही पहिलीच रॅली असेल. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत.कर्नाटक विधानसभा निवडणुका भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.२०२४ च्या लोकसभा निवडणुका भाजप आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत.दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना जनता नाकारेल, असा विश्वास या निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या जनता दलाने व्यक्त केला आहे.
हे तेच ठिकाण आहे जिथे 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान rahul gandhi यांनी ‘क्या हर मोदी सरनेम वाले चोर होते है’ असे विधान केले होते. त्यानंतर भाजप नेते पुर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. मार्च 2023 मध्ये सुरत येथील न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना यासाठी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
विशेष म्हणजे ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार आहेत, त्याच दिवशी राहुल गांधीदेखील कर्नाटकातील निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्या दिवशी होणारी त्यांच्या सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 9 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी एकाच दिवशी कर्नाटकात पोहोचतील आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होतील. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राहुल गांधींच्या सत्यमेव जयते कार्यक्रमात 5 एप्रिल ते 9 एप्रिलचा बदल केला आहे. पंतप्रधान मोदींचाही त्या दिवशी म्हैसूरमध्ये कार्यक्रम आहे.