मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, आज (ता.८) संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री विमानाने आयोध्येसाठी रवाना होणार आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते अयोध्येच्या दिशेनं रवाना झाले आहे. मात्र मनमाड येथे शिवसेना नेते- कार्यकर्ते यांच्यात राडा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.रेल्वे प्रशासनाने shivsena नेते-कार्यकर्ते यांच्यात मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला. या वादामुळे मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे तीन मिनिटे थांबली होती. काल (शुक्रवार) दुपारी नाशिक आणि ठाण्यातून दोन विशेष रेल्वेगाड्या अयोध्येसाठी रवाना झाल्या आहेत.त्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही आहेत.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नाशिकमधून घेऊन निघालेल्या रेल्वेत हा वाद झाला. बोगीत बसण्यावरून शिवसेना नेते-कार्यकर्त्यांमध्ये मोठा शाब्दीक वाद झाला. त्यामुळ manmad जँक्शनवर रेल्वे ३० मिनिटं थांबवावी लागली.रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वाद करणाऱ्यांना समजून सांगितल्यानंतर तणाव निवळला.
तीस मिनिटांनंतर रेल्वे पुन्हा अयोध्येच्या दिशेन निघाली. पण रेल्वे काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा हा वाद सुरु झाला. दोन वेळा चैन खेचून रेल्वे थांबविण्यात आली. पोलिसांनी नेते-कार्यकर्त्यांने मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला.
रविवारपासून मुख्यमंत्री दोन दिवसाच्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. ते राम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत. हनुमान गढी दर्शन पूजन, मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी, शरयू आरती आणि लक्ष्मण किल्ला मंदिरात संतांचे आशीर्वाद घेणार आहेत.