माजी संरक्षणमंत्री, काँग्रेस ज्येष्ठ नेते ए.के. ॲंटनी यांचे चिंरजीव, केरळ काँग्रेसचे नेते अनिल अँटनी यांनी काल (गुरुवारी) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
त्यावर ए.के. अँटनी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता अनिल यांचे लहान बंधू अजित अँटनी यांनी आपल्या भावाच्या भाजप प्रवेशावर टीका केली आहे. “भाजप त्यांचा वापर करुन सोडून देईल,” असे अजित अँटनी म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.अजित अँटनी म्हणाले, “अनिल यांनी हा निर्णय अतिघाईत घेतलेला दिसतो. अनिल यांचा उपयोग कढी पत्यासारखा करुन भाजप त्यांना फेकून देईल,”
वडिलांना पहिल्यांदा निराश पाहिलं..
anil यांच्या या निर्णयाबाबत आमच्या परिवाराला कुठलीही कल्पनी नव्हती. मी पहिल्यांदा माझ्या वडिलांचा (ए.के अँटनी) खूप निराश पाहिले. अनेक काँग्रेस समर्थकांचे त्यांना फोन येत असून ते वाईट भाषेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत,” अनिल हे फार काळ भाजपमध्ये राहणार नाहीत, ते पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, असे अजित म्हणाले.
पंतप्रधान modi यांच्या बीबीसीवरील माहितीपटावर अनिल टीका केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. भाजप नेता पियुष गोयल, वी मुरलीधरन आणि केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या उपस्थित अनिल अँटनी यांनी एका कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला