satara ;मोदानी हटाओ, देश बचाओ, लोकशाही बचाओ’ असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध प्रश्न विचारणारी पत्रे आज जिल्हा काँग्रेसच्यावतीने congress पाठविण्यास सुरवात केली. जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव Suresh Jadhav यांच्या नेतृत्वाखाली या पोस्ट कार्ड कम्पेनिंगची सुरूवात झाली.
यावेळी प्रदेश कार्यकारी सदस्य अजित पाटील चिखलीकर, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक, महिला काँग्रेसच्या प्रवक्त्या सौ. छायदेवी घोरपडे, प्रदेश प्रतिनिधी अन्वर पाशा खान, सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, मनोजकुमार तपासे, सुषमा राजे घोरपडे, रजिया शेख, मालन परळकर आदींनी आज टपाल कार्यालयात जाऊन पंतप्रधान मोदींना पत्रे पाठवली.यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले की, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एक लाख पत्रे पाठवली जाणार आहेत. त्याची सुरवात आज सातारा काँग्रेस भवनातून करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की, २०१४ च्या निवडणुकीआधी आणि नंतरही विविध आश्वासने दिली पण त्याची पुर्तता केलेली नाही. या दिलेल्या आश्वासनांची पुर्तता तर करावी.
अदानीच्या आर्थिक भानगड्यांची आपण जेपीसीमार्फत चौकशी कधी करणार, केंद्र सरकार अदानीच्या जेपीसीच्याचौकशीपासून पळ का काढत आहे, एसबीआय आणि एलआयसीला अदानीच्या आर्थिक भानगड्यांमुळे जो धोका निर्माण झाला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय उपाययोजना केली आहे.
निरव मोदी, ललित मोदी, मेहुल चौक्सी, विजय मल्ल्या यांना पकडून देशातील न्यायव्यवस्थेसमोर केव्हा हजर करणार, अच्छे दिन गौतम व विनोद अदानी यांना आले आहेत सर्वसामान्यांना अच्छे दिन कधी येणार, स्वीस बॅंकातील कथित काळा पैसा परत आणून प्रति नागरीक १५ लाख रूपये प्रमाणे वाटणार होता त्याचे काय झाले, आदी प्रश्नांचा समावेश आहे.