• Wed. Apr 30th, 2025

काँग्रेसला मोठा धक्का, ज्येष्ठ नेते ए.के अँटनी यांच्या मुलाचा भाजपात प्रवेश

Byjantaadmin

Apr 6, 2023

काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए.के अँटनी यांचा मुलगा केरळमधील काँग्रेस नेते अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा नेते पीयूष गोयल, वी. मुरलीधरन आणि केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या उपस्थितीत अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केला. अनिल अँटनी हे केरळ काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख होते.

अलीकडेच ‘बीबीसी’ने गुजरात दंगलीबाबात एक माहितीपट प्रदर्शित केला होता. ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या माहितीपटावर केंद्र सरकारने बंदी आणल्यानंतर काँग्रेससह विरोधीपक्षांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होते. तर, अनिल अँटनी यांनी या माहितीपटाला विरोध केला होता. तसेच, जानेवारी महिन्यात अनिल अँटनी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

भाजपात प्रवेश केल्यानंतर अनिल अँटनी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं, “अनेककार्यकर्त्यांना वाटतं, की एका कुटुंबासाठी काम करणे हा त्यांचा धर्म आहे. पण, देशासाठी काम करणे हे मला महत्वाचं वाटतं. जगात भारताला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी पंतप्रधान मोदी काम करत आहेत. तर, जे. पी. नड्डा आहे समाजासाठी चांगले काम करण्याची इच्छाशक्ती बाळगतात. आता देश मजबूत करण्यासाठी मी काम करणार आहे,” असं अनिल अँटनी यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed