• Wed. Apr 30th, 2025

सावरकर गौरव यात्रेत छत्रपतींच्या वारसांनी सहभागी होणे दुर्देवी…

Byjantaadmin

Apr 6, 2023

देशात हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत, हा द्विराष्ट्रवाद सावरकरांनी मांडून जातीभेद निर्माण केला. राष्ट्रदोही सावरकरांच्या ब्राम्हणी हिंदुत्वाचे विचार समाजात रुजविण्याचे काम सत्तापिपासू भारतीय जनता पक्ष bjp करत आहे, अशी टीका माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केली. दरम्यान, सावरकर गौरव यात्रांमध्ये छत्रपतींच्या वारसांनी सहभागी होणे हे दुर्देवी असून भाजपच्या या कृतीच्या निषेधार्थ येत्या शुक्रवारी (ता.७) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय स्वक्लेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी आमदार लक्ष्मण माने यांनी आज सातारा शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपने आयोजित केलेल्या सावरकर गौरव यात्रेवर टीका केली. लक्ष्मण माने म्हणाले,‘‘सावरकर यांच्या पत्रात माफीनामा असल्याने त्यांनी शरणागती मागितली होती. त्यामुळे सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक नसून राष्ट्रदोही आहेत. तरी देखील भाजप राज्यभरात सावरकर यात्रा काढत आहे. इतिहासाची मोडतोड करून तो लोकांसमोर मांडण्याची परंपरा ब्राम्हणांची सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed