pune : एक महिला तलाठी लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाच्या सापळ्यात सापडली आहे. सातबारा उताऱ्यावरून मृत आईचे नाव कमी करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाचाची मागणी करणाऱ्या पुरंदर तालुक्यातील चांबळी येथील महिला तलाठ्यासह दोघांनाacb अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, महिला तलाठ्यासह दोघांविरुद्ध पुणे ग्रामीणच्या सासवड police ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तलाठी नीलम मानसिंग देशमुख (वय ३२) आणि नारायण दत्तात्रेय शेंडकर (वय ५०) अशी त्यांची नावे आहेत. यामुळे याविषयी सासवड परिसरात या प्रकरणाची चर्चा होत आहे.
‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या आईचे जानेवारी २०२३ मध्ये निधन झाले होते. त्यामुळे त्यांनी सातबारा उताऱ्यावरुन आईचे नाव कमी करण्याबाबत तलाठी देशमुख यांच्याकडे अर्ज केला होता. त्यासाठी देशमुख यांनी शेंडकर याच्यामार्फत तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केलीया तक्रारनंतर सापळा लावून शेंडकर याला दोन हजारांची लाच घेताना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान शेंडकर याने तलाठी देशमुख यांच्यासाठी लाच घेतल्याचे सांगितले. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्योती पाटील करीत आहेत.