काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या केलेल्या अवमानानंतर भाजप चांगलीच संतप्त झाली आहे. यावरुन राज्यात भाजप व शिंदेंच्या शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा देखील काढण्यात येत आहे. यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली जात आहे. मात्र, याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नागपूर येथील सावरकर यात्रेवरुन भाजप आणि फडणवीसांची कोंडी केली आहे.
रोहित पवार यांनी टि्वटद्वारे भाजपावर निशाणा साधला आहे. पवार म्हणाले,भाजपाचा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संतापजनक वक्तव्य केलं तेव्हा भाजपाने त्याचा एका ब्र शब्दानेही निषेध केला नाही. ना त्यांनी राज्यात कुठे छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा काढली.
भाजपाची ही चाल कधीच विसरणार नाही…
पण याचBJPने आज नागपूरमध्ये सावरकर गौरव यात्रेत महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून सुधांशू त्रिवेदीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा आम्ही सन्मान करतो हाच संदेश दिला. शिवरायांना आराध्य दैवत मानणारा महाराष्ट्र भाजपाची ही चाल कधीच विसरणार नाही अशी टीका रोहित पवारांनी टि्वटमधून भाजपवर केली आहे.
भाजपच्या वतीने आयोजित सावरकर यात्रा नागपूरमध्ये पोहोचली. यावेळी झालेल्या सभेच्या व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री(Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पण यावेळी मंचावर पहिल्या रांगेत देवेंद्र फडणवीसांच्या शेजारी बसलेल्या भाजपाचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचं राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण ?
भाजपाचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी( Sudhanshu Trivedi )यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारं वक्तव्यं केलं होतं. राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत भाजपाची भूमिका मांडण्यासाठी त्रिवेदी यांनी सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती असं सांगण्याचा प्रयत्न केला होता.
त्याकाळात अनेक लोकं प्रस्तावित फॉरमॅटमधून बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलं होतं