कोरोनामुळे रखडलेल्या राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Market Committee Election) निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते पॅनल बनवण्यात सगळेच पक्ष गुंतले आहेत.
अशातच marathwada १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. यामागे त्या समित्यांची निवडणूकीचा खर्च झेपण्याची देखील क्षमता नसल्याचे कारण पुढे आले आहे रज्यातील एकूण १७ बाजार समित्यांच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या असून यामध्ये बहुतांश म्हणजे १४ मराठवाड्यातील आहेत.
निवडणूक रद्द झालेल्या बाजार समित्यांमध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुल्ताबाद, हिंगोली-सिरसम, नांदेड- कंधार, बिलोली, किनवट, इस्लामपूर, कुंडलवाडी, लोहा, माहूर, उपरी मुखेड, तर धाराशीव जिल्ह्यातील लोहारा आणि मोतळा या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या समावेश आहे.
तर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील या दोन्ही बाजार समित्यांचे विभाजन झाल्यामुळे या देखील निवडणुकीक अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी प्रशासक नेमले जाणार आहेत. निवडणुक रद्द झालेल्या बाजार समित्यांना दैनंदिन खर्च, व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतकेही उत्पन्न नसल्याचे समोर आले आहे.
एकीकडे बाजार समिती निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असतांना दुसरीकडे वरील समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम रद्द झाल्याने तेथील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. उर्वरित बाजार समित्यांसाठी येत्या २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.