माकणी (थोर) च्या श्री हनुमान देवस्थान परिसर विकासासाठी 1 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर;माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांचा पाठपुरावा
निलंगा/प्रतिनिधी ः- निलंगा तालुक्यातील माकणी (थोर) येथील श्री हनुमान नवसाला पावणारा हनुमान म्हणून ओळखला जातो. या देवस्थानाला लातूर जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील व कर्नाटक राज्यातील लाखो भाविक व नागरिक दर्शनासाठी गर्दी करीत असतात. या मंदीरासह परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून होत होती. सदर बाब लक्षात घेऊन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगकर यांनी या देवस्थानास ग्रामीण तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त करून देत विकासासाठी 1 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीच्या माध्यमातून देवस्थान परिसरात अनेक विकास कामे होऊन भाविकांची सोय होणार आहे. सदर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यासह पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार व्यक्त केले आहेत. या निधीच्या माध्यमातून होणार्या विकास कामांमुळे मंदीर परिसराचे सुशोभिकरण होऊन भाविकांच्या अडचणी दूर होणार आहेत.
निलंगा तालुक्यातील माकणी (थोर) येथे असलेले श्री हनुमान मंदीर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारा हनुमान म्हणून ओळख असणार्या या देवस्थानला भाविक सातत्याने गर्दी करीत असतात. विशेषतः मंगळवार आणि शनिवार या दिवशी येथे होणार्या हनुमानाच्या आराधना कार्यक्रमास हजारो भाविक उपस्थित असतात. केवळ लातूर जिल्ह्यातीलच नव्हे पर जिल्ह्यातील व कर्नाटक राज्यातील अनेक भाविक माकणी (थोर) च्या श्री हनुमान मंदीरात दर्शनासाठी येतात. या मंदीरासह परिसराचा विकास व्हावा याकरीता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे माकणी (थोर) च्या ग्रामस्थांसह भाविकांची सातत्याने होत होती. त्याचबरोबर या मंदीर परिसरात तीर्थक्षेचा ब दर्जा प्राप्त व्हावा अशीही मागणी करण्यात आलेली होती. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी याबाबत राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवलेला होता. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे माकणी (थोर) च्या श्री हनुमान देवस्थानास तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.
हनुमान मंदीर परिसरत भाविकांसाठी भक्तीनिवास व इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीकोनातून माजी मंत्री आ. निलंगेकरांनी पाठपुरावा केला. या पाठपुराव्यास यश मिळालेला असून श्री हनुमान मंदीरासह परिसराच्या विकासासाठी 1 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. या निधीच्या माध्यमातून श्री हनुमान मंदीर परिसरासत भक्तनिवास उभारण्यात येणार असून याकरीता 70 लक्ष रुपये निधी प्राप्त झालेला आहे. तसेच मंदीर परिसरात संरक्षण भिंत व स्वच्छतागृहासह स्नानगृहासाठी 35 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. यासह पाणी पुरवठा योनजेकरीता 23 लाख 93 हजार तर पथदिव्यांसाठी 8 लाख रूपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. एकुण 1 कोटी 40 लाख रूपयांच्या निधीतून श्री हनुमान मंदीर परिसराचा विकास होणार असून लवकरच या विकास कामांना सुरुवात होणार आहे. सदर निधी उपलब्ध करून दियाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस , ग्रामविकास तथा लातूरचे पालकमंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आ. निलंगेकर यांनी आभार मानलेले आहेत. तसेच मंदीर परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा केल्याने माजी मंत्री. आ. निलंगेकर यांचे माकणी (थोर) ग्रामस्थांसह देवस्थान कमिटी व भाविकांनी आभार व्यक्त केलेले आहेत. माकणी (थोर) च्या श्री हनुमान देवस्थानाच्या विकासासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी भविष्यातही निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलेली आहे.