• Tue. Apr 29th, 2025

पांढरी येथे पायाभूत सुविधांसाठी ३ कोटींचा निधी ;आमदार धिरज देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

Byjantaadmin

Apr 1, 2023

पांढरी येथे पायाभूत सुविधांसाठी ३ कोटींचा निधी ;आमदार धिरज देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

श्री. विठ्ठल आणि श्री केशव महाराज देवस्थानात उपलब्ध होणार विविध सुविधा

लातूर :रेणापूर तालुक्यामधील पांढरी (खरोळा) येथील श्री. विठ्ठल आणि श्री केशव महाराज देवस्थानात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबद्दल ग्रामस्थांनी आमदार श्री. धिरज देशमुख यांचे शनिवारी आभार मानले.

लातूर ग्रामीण मतदारसंघात विविध विकासकामे मंजूर करून आणण्यासाठी आमदार श्री. धिरज देशमुख हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच प्रादेशिक विकास योजना सन २०२२-२३ अंतर्गत नवीन कामांना मान्यता देवून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी आमदार श्री. धिरज देशमुख यांनी राज्याचे पर्यटन आणि कौशल्य विकासमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांना पत्र पाठवून त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

श्री. विठ्ठल आणि श्री केशव देवस्थानात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून यातून येथील विविध विकासकामे मार्गी लागणार आहेत. याबद्दल आमदार श्री. धिरज देशमुख यांनी श्री. मंगलप्रभात लोढा यांचे आभार मानले आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed