• Sun. Jun 15th, 2025

महाराष्ट्र महाविद्यालयात विद्यापिठस्तरीय युवती कार्यशाळा संपन्न

Byjantaadmin

Mar 29, 2023

महाराष्ट्र महाविद्यालयात विद्यापिठस्तरीय युवती कार्यशाळा संपन्न

निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत विद्यापिठस्तरीय युवती तीनदिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक, डॉ. कल्याण सावंत उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन करत असताना या युवती कार्यशाळेच्या माध्यमातून स्वत: आदरार्थी बनावे, आत्मविश्वास वाढवावा व उच्च ध्येय बाळगावे त्यासाठी आपणासमोर समाजाला दिशा देणाऱ्या आदर्श असणाऱ्या महिलांचे चरीत्र डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावे असे मत व्यक्त केले.
या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके हे उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना या कार्यशाळेतून स्वावलंबी बनण्याची प्रेरणा घेऊन स्वतःमधील नेतृत्व गुण विकसीत करावे असे मत व्यक्त केले. या समारोप समारंभाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. विठ्ठल सांडूर यांनी केले तर आभार डॉ. सुभाष बेंजलवार यांनी केले व सुत्रसंचालन कु. सपना पांचाळ व बेलकुंदे सुषमा यांनी केले.
या तीन दिवशीय कार्यशाळेत डॉ. नरेश पिनमकर यांचे ग्राहक संरक्षण या विषयावर, न्यायाधिश एस. टी. भालेराव यांचे महिलाविषयक कायदे , स्वामीराज भिसे यांचे जगाला दिशा देणाऱ्या युवती, शरद सोळुंके यांचे रणरागिणी-युवती, डॉ. शितल चव्हाण व सौ सिंधु जाधव यांचे महिला आरोग्य: समस्या व उपाय, डॉ. ज्ञानेश्वर चौधरी यांचे माहितीपटातून प्रतीबिंबित होणारे स्त्री चित्रण अशा विविध विषयांवरील अभ्यासपुर्ण व प्रेरणादायी व्याख्याने या कार्यशाळेत झाली. याशिवाय बालविवाह, विवेकी जोडीदाराची निवड, महिला आरक्षण, महिला शिक्षण, धार्मिकता आणि स्त्री अशा विविध विषयांवर सहभागी स्वयंसेविकांनी गटचर्चेत उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले.
ही तीन दिवशीय कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार, डॉ. विठ्ठल सांडूर, प्रा विश्वनाथ जाधव, शिक्षकेत्तर कर्मचारी, उमाजी तोरकड, शेख आजम, दिलीप सोनकांबळे, मनोहर एखंडे, कुंभार सिध्देश्वर महाविद्यालयातील प्राध्यापिका, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक आदिनाथ जाधव, शकिल शेख, स्वराज देशमुख, प्रशांत दापके, आकाश धुमाळ, सावता दापके, गिरी परमेश्वर इत्यादिंनी विशेष परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *