सुषमा अंधारे यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या आ.संजय शिरसाठावर तात्काळ गुन्हा नोंद करा
गणराज्य संघा सह सामाजिक संघटनेचे उपजिल्हाधिकारीकडे निवेदन तर पोलीसाकडे तक्रार…
निलंगा / (प्रतिनिधी)देशात काही काळापूर्वी सोशल मीडियावर गलिच्छ भाषेचा वापर करून एखाद्या विशिष्ट पदांवर असलेल्या व्यक्तीची बदनमानी व्हायची तेव्हा सर्व समविचारी पक्ष संघटना, महिला आयोग तात्काळ दखल घेऊन सायबर क्राईम च्या माध्यमातून सदरील विकृत व्यक्तीवर तात्काळ कारवाई करून त्याचे मुसक्या आवळत होत्या. दुर्दव्य म्हणावे लागेल की शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात घटनात्मक पदांवर असलेल्या तात्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशयारी पासून ते काही लोकप्रतिनिधी ज्यांना आपण आमदार म्हणून पाहतो. त्यांच्याकडून कधी महापुरुषां बद्दल अवमान तर कधी महिला बद्दल अपशब्द वापरून संबंध महाराष्ट्राची संस्कृतीची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येते.
शिवसेनेच्या उपनेत्या तथा गणराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष सुषमा अंधारे बद्दल एकनाथ शिंदे शिवसेना गटांचे आ. संजय शिरसाठ यांनी खालच्या पातळीवर जाऊन घाणेरडे वक्तव्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात विविध पक्षांतील महिला सह गणराज्य संघ संतापले आहे. निलंगा येथे गणराज्य संघा सह विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आ. संजय शिरसाठ यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी यासाठी उपजिल्हा अधिकारी यांना निवेदन तर निलंगा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून आ. शिरसाठ यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अन्यथा पूर्ण महाराष्ट्र आंदोलनाने पेटू असा ईशारा देखील या निवेदनद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर गणराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष रामलिंग पटसाळगे, ओबीसी चे नेते दयानंद चोपणे, भटक्या विमुक्त संघटनेचे उपाध्यक्ष विलास माने, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष रोहित बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इस्माईल लदाफ,कांग्रेस चे नगरसेवक सुधीर लखनगावे,भीम शक्तीचे अध्यक्ष दिगंबर सूर्यवंशी, गणराज्य ता. अध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी, अजय कांबळे, मुन्ना सुरवसे, दशरथ कांबळे,परमेश्वर कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत….
.
महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी संसद रत्न असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टिका केली तर सुषमा अंधारे यांनी आ. शिरसाठ यांना भाऊ म्हणून संबोधित केल्याने आ. शिरसाठ यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल गलिच्छ शब्दाचा वापर करून संपूर्ण देशातील महिलांचा अपमान केला आहे. भाऊ या शब्दाचा अर्थ समजत नसेल तर आ.शिरसाठ यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करून त्यांच्या मेंदूचा उपचार करण्यासाठी इथून आम्ही आर्थिक मदत गोळा करून आ. शिरसाठ यांना पाठवू असा खोचक टोला ओबीसी नेते दयानंद चोपणे यांनी आ. संजय शिरसाठ यांना दिला आहे….