निलंगा शिवसेनेच्या वतीने संजय शिरसाठ यास जोडे मारो आंदोलन
निलंगा: शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या प्रतिमेस जोडे मारून निलंगा शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अभय दादा साळुंखे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य, हरिभाऊ सगरे तालुकाप्रमुख अविनाश दादा रेश्मे, शहरप्रमुख सुनील नाईकवाडे, विधानसभा प्रमुख शिवाजी पांढरे, माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, बालाजी माने, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाप्रमुख लायकपाशा शेख, आडत व्यापारी प्रमुख किसन मोरे, उपतालुकाप्रमुख अर्जुन नेलवाडे, कन्हैया पाटील, मनोज तांबाळे, नामदेव शिरसले, प्रसाद बुरकुले, महिला तालुका प्रमुख रेखाताई पुजारी, शहर प्रमुख दैवता सगर, मंगलबाई कांबळे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निलंगा शिवसेनेच्या वतीने संजय शिरसाठ यास जोडे मारो आंदोलन
