कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडातील फरार आरोपी सारंग आकोलकर आणि विनय पवार यांच्याबद्दल तपासयंत्रणेच्या हाती नवे धागे दोरे लागले आहेत. या प्रकरणी एटीएसच्या तपासाचा सीलबंद अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला आहे.
हायकोर्टाच्या निर्देशानंतर कुटुंबियांच्या विनंतीवरून तपास एसआयटीकडून एटीएसकडे सुपूर्द केला होता. पानसरे यांच्या हत्येचा तपास यापूर्वी विशेष पथकाकडे होता.
मात्र, हत्येनंतर सहा वर्षांत विशेष धागेदोरे तपासात उघड झाले नाही, असा आरोप पानसरे यांच्या मुलीने अर्जाद्वारे केला होता. तपासासाठी एटीएसचे पथक नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने हा तपास एटीएसकडे वर्ग केला.पानसरे यांच्यावर त्यांच्या घराजवळच १५ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पाच दिवसांनी उपचारादरम्यान पानसरे यांचा मृत्यू झाला. मात्र एसआयटीतर्फे करण्यात आलेल्या या प्रकरणाच्या तपासाबाबत असमाधान व्यक्त करून पानसरे कुटुंबीयांनी तो एटीएसकडे वर्ग करण्याची मागणी केली होती.