• Tue. Apr 29th, 2025

राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी आता प्राध्यापक, साहित्यिक मैदानात…

Byjantaadmin

Mar 29, 2023

काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi)यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘मोदी’ आडनावाबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांसाठी शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

Rahul Gandhi News

राहुल गांधी यांना समर्थन देण्यासाठी congress देशभर मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता या मोहिमेत शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. त्यांनी पत्र लिहून राहुल गांधी यांना पाठिंबा दिला आहे.

सुडबुद्धीनं मोदी सरकारने राहुल गांधी यांच्यावर ही कारवाई केली असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. मोदी सरकारने केलेली ही कारवाई लोकशाहीच्या विरोधात असल्याचे या पत्रात म्हटलं आहे. अशा प्रकारच्या कारवाईमुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्रा. अपूर्वानंद, कवि आणि वैज्ञानिक गौहर रजा, सामाजिक कार्यकर्त्या शबनम हाशमी, निर्माता शरद राज, माजी मंत्री यशवंत सिन्हा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर, इतिहासाचे अभ्यासक इरफान हबीब यांचीही नावे या पत्रात आहेत.

काँग्रेस नेते rahul gandhi  गेल्या काही दिवसांपासून वीर सावरकरांवर टीका करत आहेत. परंतु हे प्रकरण आता वाढल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीत होत असल्याची चर्चा सुरू झाली होती.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली नाराजी काँग्रेस नेतृत्वापर्यंत पोहोचवत एकत्र राहायचे असल्याचे सावरकरांवर वक्तव्य बंद करा, असा इशारा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत तणाव वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) धावून आले आहेत.

शरद पवार म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर यांच्या भूमिका वेगळ्या असल्यामुळे त्यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी बैठकीत मांडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाअर्जून खर्गे यांनी पवारांच्या मताला दुजोरा दिला. त्यामुळे काँग्रेसने एक पाऊल मागे येत सावरकरांबाबत आपली भूमिका मवाळ करण्यास सहमती दर्शविल्यामुळे शरद पवार यांनी महाविकास आघाडी फुटण्यापासून वाचवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed