• Tue. Apr 29th, 2025

कर्नाटक विधानसभेचे बिगुल वाजलं ; हात चालणार की कमळ फुलणार ?

Byjantaadmin

Mar 29, 2023

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Assembly Election 2023) साठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मोठी घोषणा केली आहे.

१० मे रोजी कर्नाटक विधानसभेची निवडणूक (Karnataka Election Dates 2023) होणार असल्याचे निवडणूक आयोगाचे आज (बुधवारी) जाहीर केले. मतमोजणी १३ रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. (Karnataka Assembly Election Schedule)

आगामी निवडणुकीसाठी, काँग्रेसने नुकतीच १२४ उमेदवारांची नावे जाहीर केली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे वरुणामधून तर कर्नाटक अध्यक्ष डीके शिवकुमार कनकापुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावर उमटणार आहेत.

कर्नाटक विधानसाठी एकूण 224 जागांसाठी निवडणूक होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केली आहे. त्यामुळे कर्नाटकातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांची मोर्चेबांधणी अनेक महिन्यांपासून सुरु आहे.

येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने (भाजप) मुस्लिमांसाठी असलेले 4% आरक्षण काढून ते लिंगायत आणि वोक्कलिग या समहाला दिले आहे. त्यामुळेही कर्नाटकमध्ये हिंदू-मुस्लिम असा वाद होण्याची शक्यता आहे. या वेळच्या निवडणुकीत कर्नाटकची जनता कोणाच्या पारड्यात वजन टाकते याबाबत उत्सुकता आहे.

२०१८ च्या निवडणुकीत मतदारांनी कोणालाच स्पष्ट बहुमत दिले नव्हते. त्यामुळे सुरुवातीचे काही काळ काँग्रेस आणि जदयूने एकत्र सरकार स्थापन केले. मात्र, भाजपने या सरकारला धक्का देत नवी राजकीय समीकरणे जुळवली आणि सत्ता मिळवली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत (2018)भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 104 जागा जिंकल्या होत्या. तर त्या खालोखाल काँग्रेस पक्षाने 80, जदयूने 37 जागा जिंकल्या होत्या. मतदारांनी या निवडणुकीत (2018) कोणालाच स्पष्ट बहुमत दिले नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed