माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या घेतल्या भेटी
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकी संदर्भात पदाधिकाऱ्या सोबत केली चर्चा
लातूर प्रतिनिधी : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनीमंगळवार दि. २८ मार्च रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी Mघेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या निवेदनाचा व निमंत्रणाचा स्वीकार केला, संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लागलेल्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. यावेळी राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सुळ, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुलगे, विलास सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, व्हाईस चेअरमन श्याम भोसले, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा विद्याताई
पाटील, संचालक व्यंकटेश पुरी, सरचिटणीस उषाताई कांबळे, पांडुरंग वीर, शब्बीर सय्यद, फर्मान शेख, नजुमिया शेख, शिवाजी देशमुख, महादेव शेळके, Mलातूर कृषी उत्पन्न बाजार समिती गुमास्ता मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम गंभीरे, सुंदर पाटील कव्हेकर, संजय पाटील खंडापूरकर, विजयकुमार धुमाळ, योगेश देशमुख, अनिल चव्हाण, संचालक अमर मोरे, दीपक पटाडे, राजेंद्र मस्के, डॉ. दिनेश नवगिरे, व्यंकटेश सुरवसे, जगन्नाथ चव्हाण, प्रवीण पाटील, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, शशिकांत देशमुख, सुरज पाटील, गोंदेगावचे सरपंच पांडुरंग देशमुख, संभाजी रेड्डी, डॉ.अरविंद भातंबरे, बालाजी वाघमारे, पवनकुमार गायकवाड, असलम शेख, बालाप्रसाद बिदादा, लातूर Mबाजार समिती माथाडी कामगार संघटनाचे अध्यक्ष शिवाजी कांबळे, महिला काग्रेसच्या चारुशीला पाटील, सुनिता डांगे, सुलेखा कारेपूरकर, प्रमिला सतळकर, कल्पना मोरे, रेखा कानमंदे, शिल्पा इंगळे, सहदेव मस्के, नवनाथ पाटील, शिरशीचे सरपंच श्रीहरी कांबळे, विपिन गवरे, बालाजी पाटील, रघुनाथ देशमुख, गोविंद गोजमगुंडे, रामराजे जाधव, सुभाष गोपे, रमेश सूर्यवंशी, शबीर मेहताबसाब, शकीलभाई महबूबसाब, मुजीप हाश्मी, अल्लाबकश यासीम, बागवान अलिम, हरिभाऊ गायकवाड, सिकंदर पटेल, रामदास पवार, जब्बार सगरे,.संभाजी सुळ, शिवाजी कांबळे, गंजगोलाई बांगडी असोसिएशनचे अध्यक्ष जफर पटवेकर, अजीम मणियार, कुमारआप्पा पारशेट्टी, इलियाज मनियार, हरंगुळ (खु) सरपंच मनोहर पाटील, उपसरपंच आनंद पवार, उमाकांत भुजबळ, शिवाजी झुंजे,ग्यानदेव होळकर, बंडू मसलकर, गणेश सूर्यवंशी आदीसह काँग्रेस पक्षाचे
विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
दीपक राठोड यांची प्रदेश मुख्यप्रवक्तेपदी निवड झाले बददल माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले अभिनंदन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश मुख्य प्रवक्तापदी दीपक राठोड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी दीपक राठोड यांनी आमदार अमित देशमुख यांचे युवक काँग्रेसच्या प्रदेश मुख्य प्रवक्तापदी संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. लातूरशहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
क्रीकेट स्पर्धेतील विजेत्यांचे माजी मंत्री,आमदार अमित देशमुख यांनी केले अभिनंदन
बाभळगाव येथे दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ बाभळगाव व एपीजे अब्दुल कलाम सांस्कृतिक क्रीडा मंडळ बाभळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसीय जिल्हास्तरीय आमदार हॉकी चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक एपीजे अब्दुल कलाम सांस्कृतिक क्रीडा मंडळ बाभळगाव व द्वितीय क्रमांक कै. विलासराव देशमुख स्पोर्ट क्लब बाभळगाव यांनी पटकावल्याबद्दल माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी एपीजे अब्दुल कलाम सांस्कृतिक क्रीडा मंडळचे हॉकीचे प्रशिक्षक इमाम शेख, साहिल समदरगे, कार्तिक मस्के, समीर शेख, अनमोल फुलगामे, शुभम मस्के, निखिल हनमंते, ओम भाडूळे, मजर शेख आदीसह खेळाडू उपस्थित होते.