आमदार धिरज देशमुख यांनी केली पुल व बरेजच्या कामाची केली पाहणी
कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या आमदारांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचना
लातूर :-रेणापूर तालुक्यातील घनसरगाव येथील रेणा नदीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामाची तसेच, जवळगा येथील रेणा नदीवरील कोल्हापुरी बराजच्या नुतनीकरण कामाची ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी सोमवारी पाहणी केली. ही कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी बांधकाम व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता गजानन मुळे, कनिष्ठ अभियंता एस. आर. थडकर, जलसंपदा विभागाचे उप अभियंता दयानंद मामडगे, शाखा अभियंता सोमेश्वर होळकर, शाखा अभियंता सुडे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन व रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, रेणा कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, लालासाहेब चव्हाण, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, विश्वासराव देशमुख, हणमंत पवार, स्नेहल देशमुख, गोविंद पाटील, धनराज देशमुख, अजय चक्रे, बाळकृष्ण माने, मतीन अली सय्यद, प्रमोद कापसे, धनंजय देशमुख, प्रकाश सूर्यवंशी, बाळासाहेब करमुडे आदी उपस्थित होते.
—-
ग्रामस्थांनी केले ठिकठिकाणी आमदारांचे स्वागत
लातूर ग्रामीणचे आमदार सोमवारी रेणापूर तालुक्यातील विविध कामांची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत रेणापूर तालुक्यातील घनसरगाव येथील श्री. किशनराव देशमुख, सेलू येथील श्री. निखिल चित्ते, जवळगा येथील श्री. कुमार पाटील व हरवाडी येथील श्री. चंद्रकांत माने यांच्या निवासस्थानी ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्रामस्थांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.