जागृती शुगर चा सन 2022-23 हंगामाचा समारोप ६ लाख ३२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप:२ कोटी १८ लाख १७,८०० वीज निर्मिती
देवणी:-राज्यातील मराठवाडा- विदर्भ विभागात खाजगी साखर कारखानदारीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा अधिक भाव देणाऱ्या नावलौकिक असलेल्या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर कारखान्याचा सन २०२२- २३ चा चालु गाळप हंगामाचा समारोपाची सांगता कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांच्या हस्ते सोमवारी विधिवत पूजन करून करण्यात आली कारखान्याने चालु गाळप हंगामात ६ लाख ३२ हजार मॅट्रिक टन उसाचे गाळप करत कारखान्याने को जनरेशन च्या माध्यमातून २ कोटी १८ लाख १७ हजार ८०० युनिट विज निर्यात केली आहे दरम्यान चालु हंगामात ऊस गाळपाची सरासरी रिकव्हरी ११.६१(बी हेवी धरुन) असून कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व उस उत्पादक शेतकऱ्यांचा उस गाळप करण्यात आलेला आहे.
राज्याचे माजी मंत्री जागृती शुगर चे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जागृती शुगर च्या अध्यक्षा सौ गौरवी अतुल भोसले देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या साखर कारखान्याने मागचे सर्व गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडले आहेत चालु हंगामात योग्य नियोजन करून उस उत्पादक शेतकऱ्यांचे नोंदी घेतलेल्या सर्वांचे उसाचे गाळप झालेले असून यासाठी कारखाना प्रशासन शेतकी विभाग, उस तोड कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, हरवेस्टर, मुकदम, कामगार,कारखान्याचे अधिकारी ,कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे
सोमवारी झालेल्या सांगता समारोपाला जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे,रेणा साखर कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी, सुपर्ण जगताप, शशिकांत कदम,बालाजी बोबडे, कारखान्याचे सरव्यवस्थापक गणेश येवले मुख्य शेतकी अधिकारी रामानंद कदम चीफ इंजिनियर अतुल दरेकर , सर्व खाते प्रमुख,अधिकारी, कर्मचारी, कामगार आदी उपस्थित होते