महाराष्ट्र पॉली डी फार्मसी इन्स्टिट्यूट निलंगा येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शहीद दिनानिमित्त “आझाद हिंदची गाथा” या नाटकाचे सादरीकरण संपन्न
निलंगा:-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचानालय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील एक हजारावून अधिक विद्यार्थी, कलाकार आणि नाट्यनिर्माते यांनी राज्यातील ३६ जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी ७५ महाविद्यालये, ७५ ठिकाणी ७५ नाट्यप्रयोग सादर केले. महाराष्ट्र पॉली डी फार्मसी इन्स्टिट्यूट निलंगा या महाविद्यालयाची हा नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी निवड झाली होती. येथील 14 विद्यार्थ्यांच्या गटाने क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त २३ मार्च २०२३ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात “आझाद हिंदची गाथा” हा नाट्यप्रयोग सादर केला. या नाट्य प्रयोगाच्या निमित्ताने या शाहिद क्रांतिकारकांचे स्मरण करण्यात आले. तसेच त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष व बलिदान याची आठवण करून देण्यात आली.
हा नाट्य प्रयोग पाहण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र महाविद्यालायचे प्राचार्य डॉ.एम एन कोलपूके, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्यडॉ एस एस पाटील व आरोग्य अधिकारी डॉक्टर रोडे, प्राचार्य भागवत पौळ, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ संजय दूधमल, तसेच मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थितीत होते. ३६ जिल्ह्यातील ७५ महाविद्यालयांमध्ये या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची हा नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी निवड झाली या साठी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री विजय पाटील निलंगेकर, यांनी या नाट्य प्रयोगात सहभागी झालेल्या सर्व विधार्थी व मार्गदर्शक डॉ संजय दूधमल यांचे विशेष कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
सदरील नाट्य प्रयोग यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक व विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान राहिले.