• Tue. Apr 29th, 2025

वेठबिगारी करून घेणार्‍या साखर कारखान्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी ५ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

Byjantaadmin

Mar 28, 2023
वेठबिगारी करून घेणार्‍या साईबाबा साखर कारखान्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी ५ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा
लातूर –  औसा तालुक्यातील गोंद्री येथील साईबाबा साखर कारखान्यासाठी वेठबिगारी करवून घेणार्‍या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अन्यथा येत्या २५ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा आर्य प्रतिनिधी महाराष्ट्र सभा व वेठबिगार मुक्ती मोर्चाच्या वतीने आज २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
मध्य प्रदेशातील मनिहार मांगोर तालुक्यातील घाटी गावातील मजूर लातूर जिल्हतील गोंद्री साईबाबा साखर कारखान्यासाठी ऊस तोडणीचे वेठबिगारी पद्धतीने काम करताना आढळले. यामध्ये सर्व परप्रांतीय महिला व बाल मजूर आहेत. या वेठबिगारांकडून अनेक महिने काम करून घेतले.मात्र त्यांना कसलीच मजूरी दिली नाही. गावाकडे जाऊ इच्छित होते, मात्र त्यांना जाऊ दिले नाही. अडकलेल्या मजूरांना औसा तहसील प्रशासनाने सोडवले. त्यामुळे वेठबिगारी करवून घेणार्‍या गोंद्री येथील साईबाबा साखर कारखान्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, कारवाई न झाल्यास येत्या ५ एप्रिल पासून वेठबिगार मुक्ती मार्चा महाराष्ट्र व भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणार्‍या शिष्टमंडळात वेठबिगार मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष सुभाष निंबाळकर, भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेचे नेते प्रा. सुधीर अनवले, कलप्पाअण्णा बिराजदार, सुरेश कलप्पा बिराजदार, माधव तेलवाडे, भालचंद्र दानाई, सौ. काशीबाई बिराजदार आदींचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed