लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट हाऊसफुल्ल!
दुसऱ्या दिवशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह महिला भगीनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर प्रतिनिधी : पहिल्या लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सोमवारी दुसऱ्या दिवशी सिनेरसिकांची चांगली उपस्थिती होती. मराठी चित्रपटालला तर प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. ‘गिरकी’ या चित्रपटाला आलेल्या रसिकांमुळे थिएटरमधील सर्व आसने भरून गेली. सोमवार दि. २७ मार्च रोजी आज मराठीसह भारतीय भाषा व जागतिक सिनेमा विभागातील असे एकूण आठ चित्रपट दाखविण्यात आले. उद्या मंगळवारी आठ चित्रपट दाखविले जातील. उद्या चित्रपट महोत्सवाचा समारोप होत आहे. विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन, महाराष्ट्र शासन व अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लातुरात रविवारपासून राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकारतून पहिला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पीव्हीआर थिएटरमध्ये सुरू आहे.
मराठी चित्रपट हाऊसफुल्ल कविता दातीर आणि अमित सोनवणे यांनी दिग्दर्शित केलेला गिरकी हा मराठी भाषेतील चित्रपट आज दाखविण्यात आला. या चित्रपटाला रसिकांनी प्रचंड रतिसाद दिला. थिएटर भरल्यामुळे प्रवेश थांबवावा लागला. हा चित्रपट प्रेक्षकांना अतिशय भावला. तशा प्रतिक्रिया नंतर काही प्रेक्षकांनीव्यक्त केल्या. नागरी संस्कृती ते निसर्ग आणि पुन्हा नागरी संस्कृती अशारवासाची ही एक रंजक कहानी होती. एक किशोरवयीन मुलगी पॅराग्लायडिंग करताना तांत्रिक बिघाडामुळे एका जंगलात उतरते. त्या जंगलातून बाहेर पडण्याचे ती खूप प्रयत्न करते. शेवटी थकून गेलेली ती मुलगी एका भग्न आणि निर्जन किल्ल्यात आश्रयाला जाते आणि तिथे तिला एक किशोरवयीन मुलगा भेटतो. त्यांची गट्टी जमते आणि हे दोघेही निसर्गाशी एकरूप होतात आणि शेवटी ते शहरात परत येतात. असे या चित्रपटाचे कथानक होते.
‘डिर्व्हटीमेंटो’ ने आजच्या दिवसाची सांगता ऑर्केस्ट्रा संचालन करणाऱ्या महिलांपैकी एक असलेल्या झाईया झिओआनीयांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवण्यात आलेल्या डिर्व्हटीमेंटो’ या फ्रेंच भाषेतील चित्रपटाने महोत्सवाच्या आजच्या दिवसाची सांगता झाली. यालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.