• Tue. Apr 29th, 2025

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातूर शहरातील लातूर फिटल मेडिसिन सेंटरचे उद्घाटन

Byjantaadmin

Mar 28, 2023

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या
हस्ते लातूर शहरातील लातूर फिटल मेडिसिन सेंटरचे उद्घाटन

लातूर प्रतिनिधी : वैद्यकीय सेवेचे केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या लातूरात या अद्यावत लातूर फिटल मेडिसिन सेंटरची भर पडली असून परिसरातील गरजू रुग्णांचे  आरोग्य सुधारण्यासाठी ते उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर  आमदार अमित विलासराव देशमुख व्यक्त केला.डॉ. पद्मावती बियाणी तोष्णीवाल व डॉ. प्रमोद तोष्णीवाल यांच्यापुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या लातूर शहरातील मित्र नगर येथील सेंटरचा शुभारंभ मान्यवरांचा राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते मंगळवार दि. २७ मार्च रोजी करण्यात आले, यावेळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी लातूर मेडिसिन सेंटरची पाहणी केली यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी आमदार विक्रम काळे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, मुंबईच्या डॉ. वंदना बन्सल, डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. मेघना गुगळे, सुरेश पाटील, राजयोग संस्थेच्या नंदाबेहन रमेश राठी, डी.एन.भुतडा, माजी नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे, प्रकाश कासट, महादेव मुळे, संजय बोरा, अँड आशिष बाजपाई, अँड संजय पांडे, प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, प्राचार्य एस.पी.गायकवाड, प्राचार्य डॉ श्रीराम साळुंके, प्राचार्य डॉ पवार राजाराम, जगन्नाथ पाटील, अजिंक्य सोनवणे, गणेश देशमुख आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, बियाणी व तोष्णीवाल कुटुंबीय, मित्रपरिवार उपस्थित होते.यावेळी पूढे बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले, राजकीय
मतभेद असले तरी विकास प्रक्रियेत लातूर मधील सर्वांची एकजूट असते हे या शहराचे आणि जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, या वैशिष्ट्याची भविष्यातही जपणूक करून येथील सर्वांगीण प्रगतीचा वेग कायम वाढता ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही याप्रसंगी बोलताना दिली. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, बियाणी तोष्णीवाल
परिवाराने पुढाकार घेऊन लातूर शहरात वैद्यकीय क्षेत्रामध्ये आधुनिक व्यवस्था येथील नागरिकांसाठी उभी केली, एक नाविन्यपूर्ण विज्ञान आपल्यासमोर मांडण्यात आले, विज्ञान किती पुढे गेले आहे हे यातून आपणाला लक्षात येते. लोकनेते विलासराव देशमुख सोबतचा त्यांचा स्नेह आपण अनुभवला आहे लातूर या नावाच्या घरातील आपण सदस्य आहोत लातूरने आपल्या सर्वांना जोडलेले आहे. कौटुंबिक नाती जपण्याचे काम प्रत्येकाने केले, लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्र्यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे नाव दिले, त्यासाठी या महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांचा नाव देण्याचा ठराव घेतला होता. पुढे बोलताना ते म्हणाले की, वैचारिक मतभेद असू शकतात त्यातून वैयक्तिक शत्रुत्व आपण कधी केले नाही. लातूर फिटल मेडिसिन सेंटर या केंद्रामुळे वैद्यकीय क्षेत्रातील नवं तंत्र लातूरला आले, यातून सशक्त लातूर, सशक्त मराठवाडा, सशक्त महाराष्ट्र होईल या शास्त्रातून गर्भामध्ये असताना बाळाला ट्यूमर पर्यंतचे निदान करून त्यावर शस्त्रक्रिया करता येतात, ज्य शासनाने अशी केंद्र राज्यात विकसित केली पाहिजेत, प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अशी केंद्र व्हावीत, अशा केंद्रामुळे
दिव्यांगत्वावर वेळीच उपचार करता येईल. लातूर व परिसराच्या नागरिकांची गरज या केंद्रामुळे पूर्ण होईल वैद्यकीय क्षेत्रात सध्या खूप विकास होतोय लातूरमध्ये दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत असे सांगून त्यांनी लातूर शहरात लातूर फिटल मेडिसिन सेंटर उभारल्याबद्दल बियाणी तोष्णीवाल कुटुंबियांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर पद्मावती बियाणी तोष्णीवाल यांनी करून लातूर फिटल मेडिसिन सेंटरची सविस्तर माहिती दिली. यावेळी आमदार विक्रम काळे, डॉ. वंदना बन्सल, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  लक्ष्मीरमण लाहोटी, राजयोग केंद्राच्या नंदाबेहन, डॉ. मेघना गुगळे, डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. सुरेश पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मेघा पंडित यांनी केले, तर शेवटी आभार डॉ.प्रमोद तोष्णीवाल यांनी मानले.

 

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केदारनाथ शैक्षणिक संस्था लातूरचे अध्यक्ष तथा काँग्रेस कार्यकर्ते जगन्नाथ पाटील यांच्या मित्र नगर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.  यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, डॉ.डी.एन चिंते, पत्रकार अरुण समुद्रे, गणेश एस. आर. देशमुख, प्रदीप सिंह गंगणे आदी सह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed