• Tue. Apr 29th, 2025

महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे महिला बचत गटांना आवाहन

Byjantaadmin

Mar 28, 2023
माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप

महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे महिला बचत गटांना आवाहन

▪️महिला बचत गटाच्या कायम स्वरूपी विक्री केंद्रासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार

▪️महिला बचत गटाच्या 88 स्टॉल मधून 12 लाख रुपयांची विक्री

लातूर ( जिमाका ) महिलांनो तुमच्यात मोठी गुणवत्ता आहे. काम करण्याची तयारी आहे त्यासाठी स्वप्न मोठी पहा आणि ते तेवढ्याच जिद्दीने पूर्ण करा असे आवाहन जिल्हाधिकारी  पृथ्वीराज बी. पी. यांनी महिला बचत गटांच्या महिलांना केले.

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय लातूर यांच्या वतीने दि 24 ते 26 मार्च 2023 या कालावधीमध्ये कल्पतरू मंगल कार्यालय, दत्त मंदिर जवळ औसा रोड, लातूर येथे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे जिल्हा स्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री “नवतेजस्विनी महोत्सव” चे आयोजन करण्यात आले होते.  त्या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माविम मराठवाडा विभागाचे विभागीय संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी श्री सिद्धाराम माशाळे, जिल्हा समन्वय अधिकरी श्री मन्सुर पटेल,
माविम  जिल्हा कार्यालयातील सहा. जिल्हा समन्वय अधिकारी श्री दीपक टेकाळे, लेखाधिकारी श्री परमेश्वर इंगळे, सहा. संनियंत्रण अधिकारी श्री सूर्यकांत वाघमारे, तसेच अनंत हेरकर, सुरेन्द्र कांबळे, लोकसचलीत साधन केंद्राचे सर्व पदाधिकारी, व्यवस्थापक श्रीमती सुजाता तोंडारे, सविता पाटील, मंगल वाघचौरे, उषा डूमने, विवेक स्वामी, विजया श्रीमंगले सर्व उपजीविका सल्लागार, लेखापाल व सर्व सहयोगिनी उपस्थिती होत्या.
या तीन दिवसाच्या प्रदर्शनामध्ये लातूरकरांकडून उत्स्फुर्त सहभाग मिळाला. महिलांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची एकूण विक्री जवळपास 12 लाख रुपयांची झालेली आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली असली तरी महिलांनी आता तेवढ्यापुरतेच समाधानी न राहता आपले लक्ष्य, आपला दृष्टिकोन अधिक व्यापक ठेवून त्या दिशेनी वाटचाल करणे गरजेचे आहे असे प्रतिपादनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
माविम लातूर मार्फत आयोजित नवतेजस्विनी महोत्सवात 2023 मध्ये बचत गटांची एकूण 88 स्टॉल लावण्यात आलेले होते त्या सर्व सहभागी बचत गटातील महिलांचे  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
लातूर जिल्ह्यातील महिला बचत गटाची चळवळ मोठ्या स्वरुपात वाढलेली असून महिला बचत गटांची उत्पादने विक्री करिता लागणारी कायम स्वरूपी जागा, इमारत व प्रदर्शन आयोजित करण्याकरिता लागणारी मदत करण्याबाबतही जिल्हाधिकारी यांनी ग्वाही दिली. माविम ने बचत गटांना संस्थात्मक स्वरूप देवून लोकसंचलित साधन केंद्र सारख्या लोक संस्था – बचत गटांचे फेडरेशन स्थापन करून त्यांना स्वबळावर उभे करून एक स्टेप पुढे गेलेली आहे. त्यामुळे त्या माध्यमातून चांगली सेवा देता येणे शक्य झाले आहे. बचत गटांनी  त्यांची उत्पादने विक्री करण्याकरिता,त्यांना मार्केटिंग व प्रोफेशनल ट्रेनिंग देणे आवश्यक आहे.  यासाठी माविम ने पुढाकार घ्यावा असे सांगून महिला बचत गटांनी कृषि पूरक व्यवसाय सुरू करण्याकरिता लागणारी जागा, त्यात येणार्‍या अडचणी सोडविण्या करिता प्रशासन मदत करेल असेही सांगितले.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी बचत गटांच्या प्रत्येक स्टॉल ला भेटी देवून महिलांशी चर्चा केली व त्यांना मार्गदर्शन केले व महिलांचा उत्साह द्विगुणित केला.

  जिल्हा समन्वय अधिकरी श्री मन्सुर पटेल यांनी माविम जिल्हा कार्यालयच्या एकूण कामकाजाची थोडक्यात माहिती सांगून नवतेजस्विनी महोत्सवात सहभागी महिला बचत गटाच्या स्टॉल बाबत माहिती दिली.  तर माविम मराठवाडा विभागाचे विभागीय संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी श्री सिद्धाराम माशाळे यांनी माविम मार्फत राबविण्यात येत असेलेल्या नवतेजस्विनी प्रकल्पाबाबतची माहिती दिली. या वेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते महोत्सवात सहभागी बचत गटातील काही प्रातीनिधिक स्वरुपात महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.  बचत गटातील काही महिलांनी या वेळी मनोगत व्यक्त केले, शेवटी कार्यक्रमाचे आभार श्रीमती विजया श्रीमंगले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed