तिसर्या अ.भा.बौध्द धम्म परिषदेचे डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
बाबासाहेबांचा भारत बौध्दमय करण्याच्या संकल्प पूर्तीसाठी प्रयत्न करु याःखा.सुधाकर श्रंगारे
लातूर; भारतीय बौध्द महासभा,लातूर जिल्हा अध्यक्षीय मंडळ,आम्ही सारे लातूरकर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ व २६ मार्च २०२३ दरम्यान,लातूरच्या स्मृतीशेष पू.भदंत उपाली नगरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कवरील आयोजित तिसर्या अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे शानदार उद्घाटन भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख पाहुणे खा.सुधाकर श्रंगारे यांनी बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत बौध्दमय करण्याच्या संपकल्पपूर्तीसाठी सर्वजण मिळून प्रयत्नशील राहू या असे आवाहन यावेळी बोलताना केले.
या धम्म परिषदेच्या अध्यक्षपदी ताडोबा अभयारण्यातील भदंत ज्ञानज्योती महाथेरो हे उपस्थित होते.धम्मपिठावर लातूर अर्बन को-ऑप बँकेचे अध्यक्ष प्रदीप राठी,ऍड.किरण जाधव, श्रीशैल्य उटगे,अध्यक्षीय मंडळाचे मोहन माने,बसवंतअप्पा उबाळे, बालाजी कांबळे, रमेश श्रंगारे,प्रा.डी.टी.सूर्यवंशी, एस.टी.चांदेगावकर,विजय श्रंगारे, प्रा.विजय श्रंगारे, कमलाकर उबाळे,ऍड.अतिश चिकटे, व्ही.के.आचार्य,कुमार सोनकांबळे, संतोष वाघमारे, विलास घारगावकर, नितीन वाघमारे, प्रा.कांबळे, कुमार सोनकांबळे,चक्रे,राजू कांबळे,ऍड.संभाजीराव बोडके,प्रा.अनंत लांडगे,अशोक कांबळे, प्रा.बापू गायकवाड,हिराचंद गायकवाड, हणमंत कांबळे, लेखक प्रकाश घादगिणे,बौध्दाचार्य देवदत्त बनसोडे,हणमंत कांबळे आदिंची उपस्थिती होते.
पुढे बोलताना खा.सुधाकर श्रंगारे म्हणाले की,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यंानी शिका ,संंघटित व्हा आणि संघर्ष करा ,मार्याच्या जागांवर विराजमान व्हा,असा संदेश दिला होता.त्याप्रमाणे आपण चाललो आहोत,तथापि भारत बौध्दमय होण्यासाठी अशा धम्म परिषदा झाल्या पाहिजेत,त्यासाठी आपण सर्वानी एकजूटीने प्रयत्न करावेत,माझी धम्माप्रतिची बांधिलकी म्हणून या आंबेडकर पार्कवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ७५ फुट उंचीचा स्टॅच्यू ऑफ नॉलेज,पुतळा उभारण्यासाठी १० कोटी रुपये शासनाकडून मंंजूर करुन घेतले आहेत.तसेच पानगाव येथील चैत्य स्मारक ट्रस्टसाठी ७५ लाख रुपये देत असल्याचे सांगून या धम्म परिषदेला शुभेच्छा दिल्या.
जगाला बुध्दांच्या शांततेची गरजःप्रदीप राठी
सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकदा सत्काराचे योग आले ते मी टाळत आलो पण बौध्द समाजाने सुरुवातीपासून आपल्याला दिलेले प्रेम,आपुलकी,आणि आशीर्वादामुळे मी या धम्म परिषदेत सत्कार-सन्मानपत्र स्विकारला,ही आठवणींची शिदोरी जन्मभर विसरणार नाही,लातूरमध्ये जवळपास २ हजार हिंदू मंदिरे आहेत,पण जगाला शांततेचा मार्ग दाखविणार्या तथागत गौतम बुध्दाच्या विचारांची गरज म्हणून लातूरला बुध्द गार्डनची निर्मिती केली.बाबासाहेबांनी विचारपूर्वक बौध्द धम्माचा स्विकार केला होता,त्यांचे भारत बोैध्दमय करण्याचे स्वप्न होते. तथापि संपूर्ण जगाने तथागताच्या शांततेच्या मार्गाचा स्विकार करण्याची गरज असल्याचे नमुक करत प्रदीप राठी यांनी बाबासाहेबांचे नातू डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या सानिध्यात बसता आले त्याबद्दलकृतार्थ वाटल्याचे यावेळी सांगितले.
तत्पूर्वी भदंत ज्ञानज्योती महाथेरो यंाच्या हस्ते आंबेडकर पार्कवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यंाच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करुन पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.परिषेदसाठी आलेल्या भिख्खू संघाचे मंचाकडे आगमन होताच पुष्पवृष्टी करण्यात आली.त्यानंतर अध्यक्षीय मंडळाच्यावतीने धम्मपिठावर तथागत गौतम बुध्द, डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्प,पुष्पमाला वाहून,भिख्खू संघाने याचना,त्रिशरण पंचशील,बुध्दपूजा,भीमस्तुती सादर केले.तसेच तथागत गौतम बुध्दांच्या अस्थिकलशाचे पूजन करुन वंदन करण्यातआले.परिषदेचे उद्घाटक डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमांचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.तसेच त्यांना मेजर राजराम साबळे यांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाने मानवंदना दिली.त्यानंतर डॉ.भीमराव आंबेडकर यांचा पुष्पमाला,बुध्दमूर्ती भेट देवून स्वागत करण्यात आले.उपस्थित भिख्खू संघाचे गुलाबपुष्पाने स्वागत करण्यात आले. लातूर अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रदीप राठी यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा शाल,पुष्पहार,सन्मानपत्र देवून डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते यावेळी धम्मसार या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले.बाबासाहेबांनी लंडनमध्ये शिक्षण घेतलेल्या लंडन स्कूल ऑफ इंकॉनॉमिक मध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या ऐश्वर्या चिकटेचा डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या धम्म परिषदेचे प्रास्ताविक अध्यक्षीय मंडळाचे चंद्रकांत चिकटे यांनी केले.आपली मातृसंस्था भारतीय बौध्द महासभेच्या धम्मविषयक कामासाठी सदैव तत्पर असून,धम्मकार्याला होणारा विरोध सहन केला जाणार नाही असे सांगितले.माजी महापौर लक्ष्मण कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनंत लांडगे,प्रा.डॉ.लहू वाघमारे व रंजना गायकवाड यांनी केले.राजकुमार सपकाळ, छयाताई सपकाळ,राजरत्न सोनवणे,अनिल तलवार व त्यांच्या सहकार्यांनी बुध्द-भीमगीते सादर केली.
प्रारंभी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन,धम्मध्वजाचे भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते रोहण करण्यात आले.त्यानंतर हजारोंच्या धम्मरॅलीने धम्मपरिषद स्थळी आगमन झाले.दोन दिवस चालणार्या या धम्मपरिषदेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहे.रविवारच्या व्याख्यानांचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्षीय मंडळाने केले आहे.
तिसर्या अ.भा.बौध्द धम्म परिषदेचे डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
