केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा नेहमीच चर्चेतला प्रश्न आहे. केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून, विरोधकांना नोमोहरण करण्यात येत आहे, असा आरोप विरोधी पक्ष व विरोधी नेत्यांकडून वारंवर करण्यात आला आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नेते RAHUL GANDHI यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच, सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधी नेत्यांवर धाडी टाकण्यासाठीच केला गेला असा आरोप CONGRESS केला आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने आरोप करण्यात आला आहे की, ईडीकडून मागील 8 वर्षात एकूण ३०१० धाडी टाकण्यात आले. यापैकी ९५% पेक्षा जास्त धाडी या विरोधीपक्ष नेत्यांवर टाकण्यात आले आहे, असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे.ईडीने विरोधी पक्षावर टाकलेल्या धाडींची पक्षनिहाय आकडेवारी काँग्रेसने जाहीर केली आहे. यामध्ये सर्वात जास्त धाडी काँग्रेस पक्षावर केला गेला आहे, असा दावाही काँग्रेसने केला आहे. यामध्ये काश्मीरपासून ते दक्षिणेतील तामिळनाडू राज्यातील सर्वच पक्षांचा समावेश आहे.
ईडीने विरोधी पक्षावर टाकलेल्या धाडींची पक्षनिहाय आकडेवारी काँग्रेसने मांडली :
काँग्रेस : 24 वेळा
तृणमूल काँग्रेस: 19 वेळा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : 11 वेळा
शिवसेना : 8 वेळा
डिएमके : 6 वेळा
राजद : 5 वेळा
बसपा : 5 वेळा
टीडीपी: 5 वेळा
आयएनएलडी : 3 वेळा
वायएसआरपी : 3 वेळा
सीपीआय-एम : 2 वेळा
नँशनल काँफरन्स : 2 वेळा
पाडीपी : 2 वेळा
एआयएडिएमके : 1 वेळा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना : 1 वेळा