• Wed. Apr 30th, 2025

विरोधी पक्षात जाल, तेव्हा तुमची काय हालत होईल? ; शेट्टींचा भाजपला खुला इशारा..

Byjantaadmin

Mar 25, 2023

केवळ तुम्ही सत्तेत आहात, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर करत असाल, पण आज जे गैरवापर करतात त्यांनाही पुढील काळात विरोधी पक्षात जावं लागणार, त्यावेळी तुमची काय अवस्था होईल याचाही विचार करा, असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते  RAJU SHETTI यांनी भाजपला दिला आहे. काँग्रेस नेते (Rahul Gandhi) खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर सांगलीत शेट्टींनी प्रतिक्रिया दिली.

राजू शेट्टी म्हणाले की,”सद्यस्थितीत राजकारणामध्ये कशा पद्धतीचा भाषेचा वापर करावा, कशी टीका टिरण्णी करावी, याचं कसलंही ताळतंत्र राहिलेलं नाही. असंसदीय शब्द कसेही सर्रासपणे वापरले जातात, अशी स्थिती असली तरी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून न्यायालयाने ज्या तात्काळतेने शिक्षा सुनावली, ते संशयास्पद वाटत आहे. एकूणच न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्यासारखे असेच सामान्य लोकांना वाटते.

जे आज दगड मारत आहेत ते काचेच्या घरात राहत आहेत :

“खालच्या स्तरावर जाऊन जातीय तेढच निर्माण होत जाईल, वांशिक भेद निर्माण होईल, हिंसा प्रवृत्त होईल, अशीच विधाने सद्या सातत्याने होत आहेत. लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व अशाप्रकारे रद्द करणे, हे योग्य नाही, ते चुकीचेच आहे, असे माझे मत आहे,” असे शेट्टी म्हणाले.

नुसतं राजकारण करणं बाजूला ठेवा. या प्रकाराकडे पाहिल्यावर लोकशाहीवर एक प्रेम करणारा माणूस म्हणून आपल्याला खेद वाटतं. जे आज दुसऱ्यांवरदगड फेकत आहेत, ते लोक काचेच्या घरात राहतात. जर त्यांच्याकडे कोणी दगड मारला तर काचा फुटतात. तुम्ही आज सत्तेत म्हणूनम केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहात, पण आगामी काळात त्यांना विरोधी पक्षात बसावं लागेल, तेव्हा त्यांचं काय होईल , याचा त्यांनी विचार करावा,” असा इशारा शेट्टींनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *