• Wed. Apr 30th, 2025

पंतप्रधान मोदींना माझ्या पुढच्या भाषणाची भीती, म्हणून माझी खासदारकी रद्द केली : राहुल गांधी

Byjantaadmin

Mar 25, 2023

देशात लोकशाहीवर रोज आक्रमण होत असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं. अदानी यांच्या शेल कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे नाते काय? मी पण विचारणे सोडणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझ्या पुढच्या भाषणाची भीती होती, म्हणून माझी खासदारकी रद्द केल्याचे गांधी म्हणाले.Congress Leader Rahul Gandhi Press Conference live Updates rahul gandhi disqualified as mp Rahul Gandhi :  पंतप्रधान मोदींना माझ्या पुढच्या भाषणाची भीती, म्हणून माझी खासदारकी रद्द केली : राहुल गांधी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध कसे आहेत? या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर भाजपने ओरड सुरु केल्याचे राहुल गांधी म्हणाले. संसदेत माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. पण मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. मला कोणाही घाबरवू शकत नाही. माझ्यावर झालेल्या कारवाईने मी घाबरणार नाही. मी संसदेत प्रश्न विचारले, माझ्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळाले नसल्याचे गांधी म्हणाले. या देशानं मला सर्वकाही दिलं आहे. देशानं मला प्रेम, सन्मान हे सर्व दिल्याचे राहुल गांधी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *